महुआ मोइत्रा यांना बंगला रिकामा करण्यास सांगा!

लोकसभेच्या पॅनेलने गृहनिर्माण मंत्रालयाला लिहिले पत्र

महुआ मोइत्रा यांना बंगला रिकामा करण्यास सांगा!

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लाच घेऊन प्रश्न विचारल्या प्रकरणी त्यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले होते .आता त्यांचा सरकारी बंगलाही रिकामा होणार आहे. या संदर्भात, संसदेच्या गृहनिर्माण समितीने गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाला पत्र लिहून टीएमसी नेत्याला बंगला रिकामा करण्याचे निर्देश देण्यास सांगितले आहे.

महुआ मोइत्रा यांना संसदेत प्रश्न विचारण्यासाठी एका व्यावसायिकाकडून भेटवस्तू घेतल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. या प्रकरणी सभागृहाने आचार समितीच्या अहवालावर निर्णय घेतला आणि ८ डिसेंबर रोजी त्यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली.त्यांनतर आता महुआ मोईत्रा याना सरकारी बंगला देखील रिकामा करावा लागणार आहे.संसदेच्या गृहनिर्माण समितीने गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाला पत्र लिहून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा याना त्यांना मिळालेला सरकारी बंगला रिकामा करण्याचे निर्देश देण्यास सांगितले आहे.

हे ही वाचा :

काँग्रेस पक्ष देशात असताना ‘मनी हाईस्ट’ या काल्पनिक कथानकाची गरज आहे का?

कलम ३७० रद्दबातल हे योग्यच ठरवणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ‘पाक’ला झोंबला!

तीन तलाक, सेंट्रल व्हिस्टा… मोदी सरकारच्या सात निर्णयांवर सर्वोच्च न्यायालयाचीही मोहोर!

आरएसएस मुख्यालयाला प्रणब मुखर्जी यांनी भेट दिली तेव्हा…

दरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. दुबे यांनी सुप्रीम कोर्टाचे वकील जय अनंत यांचे पत्र दाखवले होते. यामध्ये महुआ आणि हिरानंदानी यांच्यात लाचेचा व्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला होता. आरोपांनंतर महुआ यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे आणि जय अनंत यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती.संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी संसदेच्या आचार समितीने आपला अहवाल लोकसभेत सादर केला, त्यावर लोकसभेत चर्चेनंतर महुआ मोईत्रा यांची संसद सदस्यत्वातून हकालपट्टी करण्यात आली होती.

 

 

 

 

Exit mobile version