दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आता अटकेची भीती वाटत आहे. दिल्ली दारू घोटाळाप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून समन्स पाठवण्यात येत आहेत.एकीकडे ईडी वारंवार समन्स पाठवत आहे, तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल नोटिसांकडे दुर्लक्ष करत आहेत. आतापर्यंत अंमलबजावणी संचालनालयाने अरविंद केजरीवाल यांना ९ समन्स पाठवले आहेत.त्यापैकी अरविंद केजरीवाल यांनी आठ वेळा समन्सकडे दुर्लक्ष केले आहे. आज गुरुवारी(२१ मार्च) ९व्या समन्स अंतर्गत ईडीने अरविंद केजरीवाल यांना हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र, दरम्यान, अटकेची भीती पाहता अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
ईडीने आपल्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये, अशी मागणी करणारी नवी याचिका मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, दिल्ली दारू घोटाळा प्रकरणाच्या तपासात सहकार्य करण्यास आपण तयार आहोत. पण ईडीने त्यांना अटक करण्यापासून रोखले पाहिजे. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सुरेश कुमार कायत यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
हे ही वाचा:
चीनची भागीदारी असलेल्या पाकमधील ग्वादर बंदरावर दहशतवादी हल्ला
जर पुन्हा औरंगजेबाशी तुलना कराल तर अन्य दोन कबरी खोदाव्या लागतील!
आरोपी साजिदची आई म्हणाली, एन्काउंटरमध्ये मुलाच्या मृत्यूचे दु:ख नाही!
नेमकं काय भोवलं ? राजकीय असंग की मनसुखच्या पत्नीचे शाप?
दरम्यान, दिल्ली दारू घोटाळाप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आप नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह याना ईडीने अटक केली आहे.दोघेही बराच काळापासून तुरुंगात आहेत.तसेच या प्रकरणी नुकतेच ईडीने बीआरएस नेत्या के कविता यांनाही अटक केली आहे.