उत्तर प्रदेशातील गाजियाबाद मध्ये एका परिवारातील चार सदस्यांनी मुस्लिम धर्माचा त्याग करत सनातन धर्म स्वीकारला आहे. हिंदू रक्षा दलाकडून हिंदू धर्माच्या रिती-रिवाजानुसार आणि पूजा पाठ करून मुस्लिम कुटुंबाला हिंदू धर्मात आणले.हिंदू रक्षा दलाची अध्यक्षा पिंकी चौधरी म्हणाल्या की, या परिवाराने आमच्याशी संपर्क केला.त्यानंतर पूर्ण विधी करून त्यांना घरी पाठवण्यात आले तसेच येणाऱ्या काळात मोठ्या संख्येने लोक सनातन धर्म स्वीकारण्यार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आसिफचे नाव आकाश चौहान, सुमैया खातूनचे नाव प्रिया चौहान,नाझीयाचे नाव अर्चना आणि तिच्या ५ वर्षाच्या लहान मुलाचे नाव आर्यन ठेवण्यात आले.यांनी आता आयुष्यभर सनातन धर्माच्या मार्गावर चालण्याचे व्रत घेतले आणि ते म्हणाले की, सनातन धर्म हा सर्वात पवित्र धर्म आहे.याचा एक भाग बनणे त्यांच्यासाठी बहुमान असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
नागपुरात होमगार्डनेचं तरुणांना मारहाण करत लुटले १० हजार
संजय राऊत यांना लगाम घालण्याची वेळ
उत्तर प्रदेशात बारावीच्या विद्यार्थ्याला मारहाण करत तोंडावर केली लघुशंका!
हार्दिक पंड्याची घरवापसी; पुन्हा मुंबई इंडियन्सकडून खेळणार आयपीएल
सनातन धर्मात परतलेल्या प्रिया चौहानने सांगितले की, ५ वर्षांपूर्वी तिचे लग्न हिंदू धर्मानुसार मंदिरात झाले होते.मात्र, त्यांनतर त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला.हिंदू रक्षा दलाच्या अध्यक्षा पिंकी चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, या परिवाराने संघटनेशी संपर्क साधला आणि स्वतः सनातन धर्मावर विश्वास व्यक्त केला.त्याच आधारावर आम्ही त्यांना सनातन धर्मात परतवण्याचे काम केले.
त्याच प्रमाणे इतर लोकांचेही सनातन धर्मात घर वापसी केली जाईल, असे त्या म्हणाल्या.भारतीय कायद्यानुसार त्यांचा हिंदू धर्मात समावेश केला जाईल. या लोकांची एसडीएमला भेटून नवीन कागदपत्रे तयार केली जातील.हा संपूर्ण कार्यक्रम गाझियाबादच्या भोपुरा मंदिरात झाला.