आशिया खंडातील सगळ्यात मोठा हाय स्पीड ट्रॅक हा भारतात तयार झाला आहे. ऑटोमोबाईलसाठी लागणार हा हाय स्पीड ट्रॅक जगातील पाचव्या क्रमांकाचा हाय स्पीड ट्रॅक असणार आहे. मध्य प्रदेशातील इंदोर येथे हा ट्रॅक असून नॅट्रॅक्स असे या हाय स्पीड ट्रॅकचे नाव आहे.
केंद्रीय अवजड उद्द्योग मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवार, २९ जून रोजी इंदोर येथील नॅट्रॅक्स या हाय स्पीड ट्रॅकचे उद्घाटन केले. आशियातील सर्वात लांब ट्रॅक अशी याची ओळख असून अंदाजे १००० एकर क्षेत्रामध्ये तो विकसित करण्यात आला आहे. हा नॅट्रॅक्स दुचाकी वाहनांपासून ते अवजड ट्रॅक्टर ट्रेलरपर्यंतच्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या वेगवान वाहतुकीवर उपाय आहे. या ट्रॅकची एकूण लांबी ही ११.३ किलोमीटर इतकी आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेला ‘व्हीप’ची गरज का पडली?
ठाकरे सरकारमध्ये पब,डिस्को,बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात
पंतप्रधान मोदींनी बोलावली संरक्षण विषयक बैठक
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा ठरल्या
या ट्रॅकचे उद्घाटन व्हर्च्युअल पद्धतीने झाले असून या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी आपले विचार प्रकट केले. वाहन निर्मिती आणि उत्पादन, तसेच सुटे भाग यांचे एक प्रमुख जागतिक केंद्र बनण्याची भारताची क्षमता आहे. आपण ‘आत्मनिर्भर भारत’ च्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत आणि या दिशेने सर्वांगीण प्रयत्न केले जात आहेत असे जावडेकरांनी सांगितले. तर भारताला वाहन निर्मितीचे केंद्र बनवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवजड उद्योग मंत्रालय कटिबद्ध आहे असेही ते म्हणाले.