आशियातील सर्वात मोठा लिक्विड मिरर टेलिस्कोप भारतात

आशियातील सर्वात मोठा लिक्विड मिरर टेलिस्कोप भारतात

भारताने पहिला लिक्विड मिरर टेलिस्कोप उभारला असून उत्तराखंड येथील देवस्थळ या डोंगरावर उभारण्यात आला आहे. आकाशातील अनेक गोष्टींचे निरीक्षण करण्यासाठी हा टेलिस्कोप मदत करू शकणार आहे. इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोप (आयएलएमटी) हा देशातील पहिला लिक्विड मिरर टेलिस्कोप असून तो आशियातील सर्वात मोठा लिक्विड मिरर टेलिस्कोप आहे.

बेल्जियम, कॅनडा आणी भारताच्या शास्त्रज्ञांनी हा टेलिस्कोप विकसित केला आहे. नैनिताल येथील देवस्थळ येथे २ हजार ४५० मीटर उंचीवर बसवण्यात आला आहे. ५० कोटी रुपये खर्च करून हा ४ मीटरचा लिक्विड मिरर टेलिस्कोप बनवण्यात आला आहे. खगोलशास्त्रीय संशोधनासाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. लिक्विड मिरर टेलिस्कोपच्या माध्यमातून खगोलशास्त्रीय तुकडे, लघुग्रह, सुपरनोव्हा आणि गुरुत्वाकर्षण भिंग इत्यादींची माहिती घेण्यात मोठी मदत होईल.

हे ही वाचा:

शोपियानमध्ये ग्रेनेड हल्ल्यात दोन मजूर जखमी

धार्मिक स्वातंत्र्यावरील अहवालावरून भारताने अमेरिकेला सुनावले

या व्यवस्थेमुळे पाकिस्तान ‘ऑनर किलिंग’ मध्ये अव्वल

यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या रिंकूवर झाला होता गोळीबार…

जगात याआधीही लिक्विड मिरर टेलिस्कोपचा वापर करण्यात आला आहे, परंतु एआरआयईएसचे संचालक प्रोफेसर दीपंकर बॅनर्जी यांनी सांगितले की, या दुर्बिणीचा वापर खगोलशास्त्रीय निरीक्षणासाठी जगात प्रथमच केला जात आहे. या टेलिस्कोपचा वापर कधी करता येईल, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. पावसाळ्यात तीन महिने वेधशाळा बंद ठेवली जाते. त्यामुळे ऑक्टोबरपासून हवामान सामान्य झाल्यावर खगोलीय घडामोडींची माहिती गोळा करण्यासाठी ही दुर्बीण उपयुक्त ठरणार आहे, असेही ते म्हणाले. या टेलिस्कोपमुळे विज्ञान आणि अभियांत्रिकी पार्श्वभूमी असलेल्या अनेक तरुणांना संशोधनाच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.

Exit mobile version