लोकसभा निवडणुका पार पडल्या असून रविवार, ९ जून रोजी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा ९ जून रोजी सायंकाळी राष्ट्रपती भवनात संपन्न होणार आहे. या सोहळ्याला जगभरातून सात हजार पाहूण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यासोबतच या सोहळ्याला सिने क्षेत्रातील मान्यवर, क्रीडापटू यांसोबतच शपथविधीसाठी सफाई कर्मचारी, तृतीयपंथी आणि सेंट्रल विस्टा प्रकल्पात काम करणारे मजूर या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. तसेच वंदे भारत आणि मेट्रो प्रकल्पासाठी काम करणारे रेल्वे कर्मचारी, केंद्रीय योजनांचे लाभार्थी आणि ‘विकसित भारत’ कार्यक्रमाचे ॲम्बेसेडर यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
आशियातील पहिल्या लोको पायलट सुरेखा यादव यांना देखील शपथविधीचे आमंत्रण मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर या वंदे भारतचे ट्रेनचे सारथ्य करणाऱ्या सुरेखा यादव या आमंत्रित दहा लोको पायलटमध्ये सामील आहेत, ज्यांना या सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे. महाराष्ट्रातील सातारा येथील रहिवासी असलेल्या सुरेखा यादव या १९८८ मध्ये भारताच्या पहिल्या महिल्या ट्रेन ड्रायव्हर बनल्या. त्यांना त्यांच्या यशस्वी कारकीर्दीत अनेक पुरस्कार मिळविले आहेत. त्या सोलापूर ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस सोलापूर वंदे भारतच्या देखील पहिल्या महिला लोको पायलट आहेत.
वंदे भारत चालविणाऱ्या सुरेखा यादव यांनी सुरुवातीला मालगाडीमध्ये लोको पायलट म्हणून रुजू होत्या. त्यानंतर त्या लांब पल्ल्यांच्या गाड्याही चालवत होत्या. त्यानंतर दहा वर्षे मुंबईतील उपनगरीय लोकल चालविण्याचे कामही त्यांनी केले आहे. नोकरीच्या सुरुवातीला पाच वर्षे सहायक लोको पायलट म्हणून सुरेखा यादव यांनी काम केले आहे. वंदे भारत चालविण्यापूर्वी बडोद्यात त्यांना आठ दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले होते.
हे ही वाचा:
८० पैकी ६ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसची उत्तर प्रदेशात ‘धन्यवाद यात्रा’
शेअर्समध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींचे शेअर्स वधारले
पुणे अपघातातील आपल्वायीन आरोपीच्या आजोबांच्या एमपीजी क्लबवर चालविला बुलडोझर
शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली हाय अलर्टवर; परिसर नो फ्लाय झोन घोषित
रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आमंत्रण
मध्य रेल्वेच्या लोको पायलट सुरेखा यादव, पश्चिम सेंट्रल रेल्वेच्या प्रीती साहू, उत्तर पूर्व रेल्वेच्या सिरीनी श्रीवास्तव, दक्षिण रेल्वेच्या असिस्टंट लोको पायलट ऐश्वर्या मेनन, दक्षिण-पूर्व रेल्वेच्या असिस्टंट लोको पायलट टिरके, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या स्नेह सिंह बघेल, दक्षिण पश्चिम रेल्वेच्या ललित कुमार, उत्तर रेल्वेचे सुरिंदर पाल सिंह, उत्तर फ्रंट रेल्वेचे सत्यराज मंडल आदी रेल्वे कर्मचाऱ्यांना नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे.