देशातील सर्वात मोठी पेंट्स उत्पादक कंपनी अशी ओळख असलेल्या एशियन पेंट्सचे सह- संस्थापक अश्विन दाणी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७९ व्या वर्षी अश्विन दाणी यांनी अखेरचा श्वास घेतला. एशियन पेंट्सला उत्पादनात देशातील सर्वात मोठी कंपनी करण्यात दाणी यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
अश्विन दाणी यांनी १९६८ सालापासून एशियन पेंट्समधील त्यांच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतरच्या वर्षांत त्यांनी या कंपनीचे नेतृत्वही केले. एशियन पेंट्सला भारतातील यशस्वी आणि सर्वात मोठी पेंट्स कंपनी बनविण्यात अश्विन दाणी यांचे मोठे योगदान आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये अश्विन दाणी यांची एकूण संपत्ती ७.१ अब्ज डॉलर होती.
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये, एशियन पेंट्सचा महसूल ३४ हजार ४८८ कोटी रुपये होता. कंपनीचा निव्वळ नफा हा ४ हजार १०१ कोटी रुपये होता. अश्विन दाणी यांनी एशियन पेंट्ला नवीन उंचीवर नेऊन ठेवले आहे.
हे ही वाचा
रेल्वे कर्मचारी ‘घुसले’ मोबाईलमध्ये, रेल्वे शिरली प्लॅटफॉर्मवर!
‘बारामती ऍग्रो’ प्लांट ७२ तासांत बंद करण्याच्या रोहित पवारांना सूचना
विमानतळांची कामे मार्गी लावण्यासाठी खासगी कंपनीकडील पाच विमानतळांचा ताबा ‘एमआयडीसी’ने घ्यावा
सन २०२४ आणि २०२९मध्ये ‘एक देश, एक निवडणूक’वर उमटू शकते मोहोर!
अश्विन दाणी यांचा जन्म २६ सप्टेंबर १९४४ रोजी मुंबईत झाला होता. १९६६ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात बीएस्सी पदवी मिळवली. त्यानंतर ते अमेरिकेला गेले आणि तिथे त्यांनी अक्रॉन विद्यापीठातून रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. १९६८ मध्ये, त्यांनी एशियन पेंट्सच्या व्यवसायात प्रवेश केला. अश्विन दाणी यांचे वडील आणि इतर तिघांनी मिळून स्वातंत्र्यपूर्व काळात, १९४२ साली एशियन पेंटची स्थापना केली होती. एशियन पेंट केवळ भारताचीच नाही तर आशियातील मोठी रंग कंपनी ठरली आहे.