भारताची गोल्फपटू अदिती अशोकने महिला एशियन गेम्समध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. चीनमधील हांगझू येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी भारतीय गोल्फर अदिती अशोक ही पहिली भारतीय महिला ठरली आहे.
२०२१ मध्ये जपानमध्ये झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेत केलेल्या दमदार कामगिरीमुळे अदिती अशोक ही चर्चेत आली होती.त्यावेळी तिला पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली होती.मात्र, आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत अदितीने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला.तिसऱ्या फेरीपर्यंत अदिती अव्वल स्थानावर होती. मात्र, अंतिम टप्प्यात तिला अपयश आले आणि शेवटी दुसरे स्थान पटकावत तिने रौप्यपदक मिळवले. शेवटच्या फेरीत ७ शॉट्सची आघाडी घेतल्यानंतर, अदितीने +५ मिळवले आणि थायलंडच्या अर्पिचाया युबोलने सुवर्णपदक जिंकून अव्वल स्थान पटकावले.तर दक्षिण कोरियाच्या ह्युन्जो यूनेने कांस्यपदक मिळविले.
हे ही वाचा:
ईदच्या जुलूसमधील टवाळखोरांकडून महिला पोलीस कॉन्स्टेबलची छेड, विक्रोळीत तणाव
सुप्रियाताई, विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नका, वास्तव समजून घ्या!
चांदिवलीमध्ये माकडांचा धुमाकूळ !
२०१४ मध्ये इंचॉन गेम्समध्ये २१ व्या स्थानावर राहिलेल्या अदितीने यास्पर्धेत आपले वर्चस्व दाखवले.या स्पर्धेत तिची दमदार कामगिरी पाहता सुवर्णपदक मिळण्याची आशा लागली होती मात्र,अंतिम फेरीत बाजू पलटली आणि अदितीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
अदिती अशोकने जिंकलेल्या रौप्यपदकाबरोबरच भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या पदकांची संख्या ३९ वर पोहचली आहे.आतापर्यंत १० सुवर्ण ,१५ रौप्य आणि १४ कांस्यपदक भारतीय क्रीडापटूंनी जिंकली आहेत.सर्वाधिक पदके ही नेमबाजीमध्ये मिळाली आहेत.नेमबाजीमध्ये आतापर्यंत ६ सुवर्ण, ८ रौप्य आणि ५ कांस्य पदके जिकली असून याची संख्या १९ वर पोहचली आहे.