आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राने जिंकले सुवर्णपदक!

१७ सुवर्णपदकासह भारताची ८० पदकांची कमाई

आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राने जिंकले सुवर्णपदक!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत पदकांच्या संख्येत भर घालत आहेत.भारताचा आघाडीचा भालाफेकपटू नीरज जोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा ८८.८८ मीटर भालेफेक करत आघाडीवर राहिला. तर भारताचाच किशोर जेना दूसऱ्या क्रमांकावर राहिला. किशोरने ८७.५४ मीटर भालाफेक करत रौप्य पदकावर नाव कोरले आहे.नीरज चोप्राशिवाय भारताचा किशोर जेना यानेही दमदार परफॉर्म केला. रौप्य पदक पटकावत किशोर जेना याने पॅरिस ऑलम्पिकमध्ये पात्र झाला आहे.

नीरजने भालाफेकीत पहिल्या प्रयत्नाता ८२.३८ मीटर थ्रो केला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८४.४९ मीटर दूर थ्रो केला. चौथ्या प्रयत्नात नीरज याने ८८.८८ मीटर भाला फेकला. पाचव्या प्रयत्नात त्याने ८०.८० मीटर थ्रो केला. तर जेना याने चौथ्या प्रयत्नात ८७.५४ मीटर थ्रो केला. किशोर जेना याने रौप्य पदकावर नाव कोरलेय.तसेच भारतच्या महिला संघाने ४x4०० मीटर रिले स्पर्धेत दमदार कामगिरी करत पदक मिळवले आहे. ऐश्वर्या, प्राची, शुभा आणि विथ्या यांनी शानदार कामगिरी करत रौप्य पदकावर नाव कोरले आहे.बीडचा अविनाश साबळे याने आणखी एक पदक पटकावले आहे. साबळे याने ५ हजार मीटर स्पर्धेत रौप्य पदक मिळवले आहे.

हे ही वाचा:

पुण्याच्या पालकमंत्री पदी उपमुख्यमंत्री अजित पवार!

देवरिया नरसंहारातील आरोपींविरोधात बुलडोझर कारवाईची तयारी

आपचे खासदार संजय सिंग यांच्या निवासस्थानी ईडीचे छापे

इटलीमध्ये पर्यटकांची बस उलटून २१ ठार

सुनील कुमारने जिंकले गोल्ड
हरमिलन बैंस हिने महिला ८०० मीटर रेसमध्ये रौप्य जिंकले आहे. तर सुनील कुमार याने रेसलिंगमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे. त्याशिवाय स्क्वॉश बॉक्सिंग आणि रेसलिंगमध्ये १-१ कांस्य जिंकले आहे.

जाकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेचा विक्रम भारताच्या खेळाडूंनी मोडीत काढला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताने ७० पदकांची कमाई केली होती. पण यंदा हा विक्रम मोडीत निघाला आहे. १७ सुवर्णपदकासह भारताने जवळपास ८० पदकांवर नाव कोरले आहे. यंदा भारत १०० पदकांचा आकडा पार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version