तजिंदरपालसिंगने केली सुवर्णविजेती गोळाफेक!

सुवर्णपदकावर नाव कोरत तुर बनला चौथा भारतीय गोळा फेकपटू

तजिंदरपालसिंगने केली सुवर्णविजेती गोळाफेक!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या तजिंदरपाल सिंग तूरने गोळाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.तजिंदरपाल सिंग तूरचा सुरुवातीचा प्रवास कठीण गेला.त्याने सुरुवातीला जवळपास २० मीटर इतका गोळा फेकला. परंतु तो नो थ्रो मानला गेला. त्यानंतर त्याचा दुसरा थ्रो देखील बाद करण्यात आला.त्यामुळे तजिंदरपाल सिंग तूर निराश झाला होता.तूरने चौथा गोळा फेकत २०.०६ मीटर इतके अंतर यानंतर पार केले परंतु प्रतिस्पर्धीने त्याच्यापेक्षा २०.१८ मीटर इतका गोळा लांब फेकल्याने मागे पडला.मात्र,त्याने सहाव्या प्रयत्नात २०.३६ मीटर गोळा फेकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

 

स्पर्धेमध्ये आव्हान देणारा तजिंदरपाल सिंग तुरचा प्रतिस्पर्धी सौदी अरेबियाचा मोहम्मद दाउदा टोलो याने गोळाफेकमध्ये १९.९३ मीटर इतका गोळा थ्रो केला.त्यानंतर तुरने चौथा गोळा फेकत २०.०६ मीटर अंतर पार केले तेव्हा सुवर्णपदक निश्चित झाल्याचे तुरला वाटले.मात्र, त्याचा प्रतिस्पर्धी टोलो याने गोळा थ्रो करत २०.१८ मीटर अंतर पार केले.तूरचा पाचवा थ्रो डिफॉल्ट झाला.भारताच्या तुरकडे सहावी आणि शेवटची संधी होती, मात्र त्याने हार न मानता शेवटचा थ्रोमध्ये गोळा २०.३६ मीटर इतका लांब फेकत मजल मारली आणि तुरने सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. तजिंदरपाल सिंग तूरची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.सौदी अरेबियाच्या मोहम्मद दाउदा टोलोला भारताच्या तूरचे अंतर पार न करता आल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

हे ही वाचा:

कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, संतप्त प्रवाशांचा दिवा स्थानकात रेल रोको

ते जर्मनीच्या अध्यक्षांचे निवासस्थान, बोर्डिंग स्कूल नव्हे!

गोल्फपटू अदिती अशोकने रचला इतिहास!

‘उत्तर प्रदेशमधील चकमकी राज्य-पुरस्कृत नाहीत’

तजिंदरपाल सिंग तूरने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरत चौथा भारतीय गोळा फेकपटू बनला आहे. या अगोदर सुवर्णपदक मिळविणारे भारतीय गोळा फेकपटू प्रद्युमन सिंग ब्रार (१९५४ आणि १९५८), जोगिंदर सिंग (१९६६ आणि १९७०), आणि बहादूर सिंग चौहान (१९७८ आणि १९८२) यांच्या पावलावर पाऊल ठेवत तजिंदरपाल सिंग तुरने चौथ्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले.१९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या १२ सुवर्ण, १६ रौप्य आणि १६ कांस्य अशी ४४ पदकांवर पोहोचली आहे.

 

 

Exit mobile version