भारताच्या हॉकी संघाने दक्षिण कोरियाला नमवत अंतिम फेरीत मारली धडक !

चीनशी होणार अंतिम सामना

भारताच्या हॉकी संघाने दक्षिण कोरियाला नमवत अंतिम फेरीत मारली धडक !

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने आपली प्रभावी कामगिरी सुरू ठेवत उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून चीनच्या संघाने प्रथमच विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला आहे.

सोमवारी (१६ सप्टेंबर) पार पडलेल्या उपांत्य फेरीत भारताच्या संघाने दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव केला. भारतासाठी या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन, तर उत्तम सिंग आणि जर्मनप्रीत सिंगने प्रत्येकी एक गोल केला. दक्षिण कोरियाकडून एकमेव गोल जिहुन यांगने तिसऱ्या क्वार्टरमध्ये केला.

दक्षिण कोरियाविरुद्ध भारताने पहिल्या क्वार्टरपासूनच आघाडी कायम ठेवली.  दक्षिण कोरियाने शेवटपर्यंत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय संघाने त्यांना रोखून धरले. आजच्या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता भारतीय संघाचा अंतिम सामना मंगळवार (१७ सप्टेंबर) रोजी चीनशी होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत कांस्य पदक जिंकले होते. उद्या चीन बरोबर होणाऱ्या सामन्यात अशीच चमकदार कामगिरी करत भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकावी, अशी आशा चाहत्यांनी लावून धरली आहे.

हे ही वाचा : 

गेल्या १०० दिवसांत खूप अपमान झाला, पण ध्येयासाठी मी शांत राहिलो!

महाराष्ट्र भिकेला लावण्याचे डोहाळे…

राहुल गांधी, काँग्रेस जम्मू-काश्मीरला दहशतवादाकडे ढकलू इच्छितात!

‘ती’ प्रेस रिलीज खोटी

 

Exit mobile version