भारतात क्रिकेट पाहणाऱ्यांची संख्या मोठी असून नुकतीच इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही स्पर्धा पार पडली. संपूर्ण आयपीएल स्पर्धा जिओ सिनेमावर मोफत पाहता येत होती. शिवाय मोफत असल्यामुळे जिओसिनेमाला भरघोस प्रतिसाद देखील मिळाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर या स्पर्धेत असणाऱ्या डिस्नी हॉटस्टारने देखील मोठा निर्णय घेत क्रिकेट चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
डिस्नी + हॉटस्टार प्लॅटफॉर्मने आशिया कप आणि आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप या दोन महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धांचा मोबाईलवर मोफत स्ट्रीमिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. डिस्नी + हॉटस्टार असलेल्या सर्व मोबाईल वापरकर्त्यांना या दोन्ही स्पर्धा मोफत पाहता येणार आहेत.
“डिस्नी + हॉटस्टार भारतात वेगाने विकसित होत असलेल्या ओटीटी व्यवसायामध्ये आघाडीवर राहिले आहे. तसेच दर्शकांना चांगला अनुभव मिळावा म्हणून आम्ही अनेक नवीन कल्पना सुरू केल्या आहेत. त्या विविध नवकल्पनांमुळे आम्हाला आमच्या दर्शकांना आनंदी करता आले आहे. आशिया कप आणि ICC मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप या स्पर्धा मोबाईल वापरकर्त्यांना मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे आम्हाला इको सिस्टीम विकसित करण्यासाठी मदत मिळेल,” अशी माहिती डिस्नी + हॉटस्टारचे प्रमुख साजिथ शिवनंदन यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
तुमचाही दाभोलकर होणार; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी
त्या रेल्वे पोलिसांनी चार महिन्यांत ५३ जणांचे जीव वाचवले!
निर्मला सितारामन यांच्या मुलीचा अत्यंत साधेपणाने विवाह
पाकिस्तान सीमेवर ३७ कोटींचे हेरॉईन जप्त
यंदा जिओसिनेमावर आयपीएलला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. जिओ सिनेमावर तब्बल ३.२ कोटींपेक्षा जास्त लोकांनी आयपीएलचा अंतिम सामना पहिला. या आकडेवारीने पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. तसेच क्वालिफायर २ चा मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झालेला सामना २.५७ कोटींपेक्षा अधिक लोकांनी जिओसिनेमावर पाहिला होता.