26 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरविशेषभारत- पाकिस्तान लढत २ सप्टेंबरला

भारत- पाकिस्तान लढत २ सप्टेंबरला

आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

Google News Follow

Related

आशियाई क्रिकेट परिषदेने बुधवार, १९ जुलै रोजी ‘आशिया कप २०२३’ चे वेळापत्रक जाहीर केले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आशिया चषक २०२३ चे वेळापत्रक जारी केले आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेमधील मैदानांवर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ही स्पर्धा होणार आहे.

भारताचे दोन्ही सामने श्रीलंकामधील कँडी मैदानावर होणार आहेत. भारताचा पहिला सामना २ सप्टेंबर रोजी पाकिस्तानसोबत होणार आहे तर दुसरा सामना नेपाळविरोधात ४ सप्टेंबर रोजी होणार आहे. आशिया चषक स्पर्धेचे एकूण १३ सामने होणार आहेत. यापैकी चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. तर उर्वरित नऊ सामने श्रीलंकेमध्ये होणार आहेत.

स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तान आणि नेपाळचा संघ आमनेसामने असणार आहेत. ३० ऑगस्ट रोजी हा सामना मुलतानमध्ये खेळवला जाणार आहे. स्पर्धेतील दुसरा सामना ३१ ऑगस्ट रोजी कँडी येथे बांगलादेश विरुद्ध श्रीलंका होणार आहे. त्यानंतर बहुचर्चित असा भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. ‘अ’ गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळचा संघ आहे. तर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश ‘ब’ गटात आहेत. दोन्ही गटातील टॉप-२ संघ सुपर-४ साठी पात्र ठरणार आहेत. त्यानंतर त्यांच्या गटातील पहिला संघ आणि दुसऱ्या गटातील दुसरा संघ प्रत्येकी एक सामना खेळतील. त्यामुळे हे दोन्ही संघ अंतिम सामन्यातही भिडू शकतात. या स्पर्धेचा अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

वीज देयक गैरव्यवहाराची एसआयटीमार्फत चौकशी होणार

मन हेलावून टाकणारी घटना; चार महिन्यांचे बाळ नाल्यात वाहून गेलं

सरकारला घटनाबाह्य म्हणणारे उद्धव ठाकरे अजित पवारांच्या भेटीला

जनतेचा एकच पुकार, देशात पुन्हा मोदी सरकार

‘आशिया कप’ स्पर्धेचे वेळापत्रक

  • पाकिस्तान विरुद्ध नेपाळ – ३० ऑगस्ट
  • बांगलादेश विरुद्ध श्रीलंका – ३१ ऑगस्ट
  • भारत विरुद्ध पाकिस्तान – २ सप्टेंबर
  • बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान – ३ सप्टेंबर
  • भारत विरुद्ध नेपाळ – ४ सप्टेंबर
  • श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान – ५ सप्टेंबर

‘सुपर चार’चे सामने

  • अ- १ विरुद्ध ब- २ – ६ सप्टेंबर
  • ब- १ विरुद्ध ब- २ – ९ सप्टेंबर
  • अ- १ विरुद्ध अ- २ – १० सप्टेंबर
  • अ- २ विरुद्ध ब- १ – १२ सप्टेंबर
  • अ- १ विरुद्ध ब- १ – १४ सप्टेंबर
  • अ- २ विरुद्ध ब- २ – १५ सप्टेंबर
  • अंतिम सामना – १७ सप्टेंबर
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा