३० ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंका येथे सुरू होणाऱ्या आशिया चषक २०२३ साठी भारतीय संघ निवडीबाबत भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली २१ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे बैठक घेणार आहे. आशिया चषकाच्या संघ निवडीसाठी बीसीसीआयला अखेर मुहूर्त मिळाला आहे. संघ निवडीच्या बैठकीला कर्णधार रोहित शर्मा उपस्थित राहणार आहे.
पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश या संघांनी आधीच आशिया चषक संघ जाहीर केला असून भारतीय संघातील मोठ्या खेळाडूंच्या दुखापतीमुळे भारताच्या संघाच्या घोषणेला विलंब झाला आहे.तसेच इंग्लंड,ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्ताननेही विश्वचषक संघ जाहीर केले आहेत.या देशांनी संघात १५ पेक्षा जास्त सदस्यांची निवड केली असून भारतीय संघ १५ सदस्यांची निवड करणार की आणखी काही खेळाडू निवडणार हे पाहणे मनोरंजक असेल.
हे ही वाचा:
दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब असल्याचा बनावट फोन
द्युती चंदवर चार वर्षांची बंदी, उत्तेजक चाचणीत ठरली दोषी
फुटिरतावादी यासिन मलिकची पत्नी पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारमध्ये
भारतीय नौदलाची INS विंध्यगिरी सज्ज; राष्ट्रपतींच्या हस्ते जलावतरण
राहुल आणि श्रेयस अय्यर हे दुखापतीवर मात करत आहेत. बुमराह आयर्लंडविरोधात कमबॅक करत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, केएल राहुल तंदुरुस्त झाला असून आशिया चषकासाठी तंदुरुस्त आहे. त्याशिवाय श्रेयस अय्यर याच्याबाबतही सकारात्मक बातम्या समोर येत आहेत. राहुल आणि अय्यर यांची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर श्रेयस अय्यर उपलब्ध नसेल तर बीसीसीआय सूर्यकुमार यादव याला संधी देणार आहे. अय्यरच्या अनुपस्थिती गेल्या काही दिवसांपासून सूर्याला भारतीय संघात स्थान दिले जातेय.
त्याशिवाय तिलक वर्माच्या निवडीबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, केएल राहुल तंदुरुस्त असल्याने संजू सॅमसन याचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. दुसरा विकेटकिपर म्हणून टीम इंडिया ईशान किशन याचा विचार करु शकते. युवा खेळाडू आयर्लंडमध्ये असल्याने काही दिवसांचा अवधी घेत ही संघनिवड लांबणीवर पडली होती. अखेर आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे. २१ ऑगस्ट रोजी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे.