भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. सध्या या मालिकेत भारत २-१ सह आघाडीवर आहे. चौथ्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली होती. मात्र, भारतीय संघाने चौथ्या कसोटीच्या पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवत इंग्लंडचा निम्मा संघ ११२ धावांवर तंबूत पाठवला आहे.
भारतीय गोलंदाज आकाश दीप याने पदार्पणात चांगली कामगिरी करत तीन फलंदाजांना माघारी धाडले आहे. अशातच रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी त्याला साथ देत दोन फलंदाज बाद केले. अश्विनने इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोला बाद करून ऐतिहासिक कामगिरी देखील केली आहे.
इंग्लंडविरुद्ध अश्विनची ही कसोटीतील १०० वी विकेट ठरली आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धही ११४ विकेट्स घेत हा टप्पा ओलांडला आहे. पण, एकाच संघाविरुद्ध १०० विकेट्स आणि १००० हून अधिक धावा करणारा तो पहिला आशियाई खेळाडू ठरला आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध १०८५ धावा केल्या आहेत.
चौथ्या कसोटीत आकाश दीप इन उत्कृष्ट कामगिरी करत पहिल्या षटकापासून इंग्लंडच्या संघावर अंकुश ठेवला होता. आकाशने ३ विकेट्स घेतल्या असून एकाच षटकात बेन डकेट (११ धावा) आणि ऑली पोप (० धावा) यांना त्याने माघारी धाडले. नंतर त्याने क्रॉलीलाही (४२ धावा) तंबूत धाडले. क्रॉलीचा त्याने सुरुवातीच्या षटकातच त्रिफळा उडवला होता, परंतु नो बॉलमुळे त्याला जीवदान मिळाले होते.
हे ही वाचा:
रामलल्लाच्या दरबारात महिन्याभरात ६२ लाख भाविकांची हजेरी
पंतप्रधान मोदी पुन्हा ठरले जगभरातील सर्वांत लोकप्रिय नेते
नाइटक्लबने प्रवेश न दिल्याने भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा गारठून मृत्यू
शरद पवार यांच्या गटाला ‘तुतारीवाला माणसा’चे चिन्ह
एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध कसोटीत १००० हून अधिक धावा आणि १०० हून अधिक विकेट्स घेणारे खेळाडू
- गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज) वि. इंग्लंड
- माँटी नोबल (ऑस्ट्रेलिया) वि. इंग्लंड
- विलफ्रेड ऱ्होड्स (इंग्लंड) वि. ऑस्ट्रेलिया
- इयान बॉथम (इंग्लंड) वि. ऑस्ट्रेलिया
- जॉर्ज गिफन (ऑस्ट्रेलिया) वि. इंग्लंड
- स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) वि. ऑस्ट्रेलिया
- आर अश्विन (भारत) वि. इंग्लंड