अश्विनी भिडेंची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती

पुढील आदेशापर्यंत मेट्रोच्या व्यवस्थापकीय पदाचा कार्यभार सांभाळण्याचेही निर्देश

अश्विनी भिडेंची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (MMRCL) व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची बदली झाल्याचे वृत्त आहे. अश्विनी भिडे यांची आता मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय अश्विनी भिडे यांना त्वरीत या पदाचा कारभार हाती घेण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत मेट्रोच्या व्यवस्थापकीय पदाचा कार्यभार सांभाळण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाचा पदभार हे ब्रिजेश सिंह हे पाहत होते. त्यानंतर आता नव्या सरकारमध्ये अश्विनी भिडे ही जबाबदारी सांभाळतील. अश्विनी भिडे यांना त्वरीत या पदाचा कारभार हाती घेण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत मेट्रोच्या व्यवस्थापकीय पदाचा कार्यभार सांभाळण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा : 

“कुंभमेळा म्हणजे एकतेचा भव्य यज्ञ; यात जातीचे भेद नाहीसे होतात”

चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू प्रकरणी ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक

‘जॉय बांगला’ यापुढे बांगलादेशचा राष्ट्रीय नारा नाही!

उद्धव ठाकरेंना बांगलादेशातील हिंदुंबद्दल कणव, मोदींनी लक्ष घालावे अशी मागणी

आश्विनी भिडे या १९९५ च्या बॅचच्या आएएस अधिकारी आहेत. त्यांना सनदी सेवेतील तब्बल २५ वर्षांचा आहे. मुंबई मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. आता त्या मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयाचा पदभार सांभाळणार आहेत. राज्यात महायुतीचे सरकार येताच काही प्रशसकीय अधिकाऱ्यांच्या बदलीबद्दल महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. दरम्यान, श्रीकर परदेशी यांची बदली मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. परदेशी यांनी यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केलं आहे. श्रीकर परदेशी यांनी प्रतिनियुक्तीवर पीएमओमध्ये देखील काम केलं आहे. श्रीकर परदेशी आता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून काम पाहतील. श्रीकर परदेशी भारतीय प्रशासकीय सेवेतील २००१ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त म्हणून काम केलं आहे.

Exit mobile version