अश्विनचे ऐतिहासिक शतक, भारताला सावरले

जाडेजासह बांगलादेशविरुद्ध १९५ धावांची भागीदारी

अश्विनचे ऐतिहासिक शतक, भारताला सावरले

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची अवस्था ६ बाद १४४ अशी दारुण झालेली असताना आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांनी सातव्या विकेटसाठी १९५ धावांची अभेद्य भागीदारी करून बांगलादेशचे मनसुबे उद्ध्वस्त केले. अश्विनने १०२ धावांची खेळी केली असून जाडेजाच्या नावावर ८६ धावा आहेत. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. भारताने आता ६ बाद ३३९ धावा केल्या आहेत.

पहिल्या दिवशी भारताने फलंदाजीला सुरुवात केली पण भारतीय संघाची सुरुवात अडखळत झाली. रोहित शर्मा अवघ्या ६ धावांवर बाद झाला तर शुभमन गिल आपले खातेही उघडू शकला नाही. विराट कोहलीही ६ धावांत माघारी परतला. बांगलादेशच्या हसन मेहमूदने (५८-४) भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले. यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. त्यानंतर हे दोघेही लागोपाठ बाद झाले. मग के.एल. राहुलही १६ धावा करून माघारी परतला.

हे ही वाचा:

माजी प्राचार्य संदीप घोष आता नावापुढे डॉक्टर लावू शकणार नाहीत !

…पुन्हा रेल्वे उलटवण्याचा प्रयत्न, रुळावर टाकला ७ मीटरचा खांब!

नंदुरबारमध्ये दोन गट भिडले, गाड्यांची जाळपोळ, तोडफोड!

ख्रिश्चन धर्मांतराला रोखण्यासाठी हनुमान यज्ञ

अश्विनचे हे सहावे कसोटी शतक होते. शिवाय, हे त्याचे पहिले सर्वात वेगवान शतक ठरले. १०८ चेंडूंत त्याने ही शतकी खेळी साकारली. विशेष म्हणजे घरच्या मैदानावर त्याने ठोकलेले हे दुसरे शतक आहे. गोलंदाज म्हणून अश्विनच्या खात्यात ५१६ बळी आहेत. त्यात ३६ वेळा त्याने पाच बळी घेतले आहेत. शेन वॉर्नपेक्षा तो फक्त एक पाऊल मागे आहे. वॉर्नच्या खात्यात ३७वेळा पाच बळी घेण्याचा पराक्रम जमा आहे.

 

अश्विन नाबाद १०२

पहिले वेगवान शतक (१०८ चेंडूंत)

२० वेळा अर्धशतक पूर्ण

चिदंबरम स्टेडियमवर दुसरे शतक

२० अर्धशतके आणि ३०पेक्षा अधिक वेळा पाच बळी घेणारा पहिला क्रिकेटपटू

Exit mobile version