आशिया कप जिंकल्यानंतर आता भारताचा संघ ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी केएल राहुल कर्णधारपदाची धुरा सांभाळणार असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे. तर, आर अश्विन संपूर्ण मालिकेत खेळणार आहे. आगामी मालिकेसाठी बीसीसीआयने दोन वेगळे संघ जाहीर केले असून तिसऱ्या सामन्यात विश्वचषक स्पर्धेतील खेळाडू आपली ताकद आजमावतील.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी दोन संघ जाहीर केले आहेत. गोलंदाज आर. अश्विनने सन २०२२नंतर पहिल्यांदाच एक दिवसीय सामन्यात पुनरागमन झाले असून तो संपूर्ण मालिका खेळेल. तर, तिसऱ्या सामन्यासाठी पुन्हा रोहित शर्मा याच्याकडे कर्णधारपदाची धुरा असेल.
अक्षर पटेल याला दुखापत झाल्यामुळे आशिया कपच्या अंतिम सामन्यात स्थान मिळालेल्या वॉशिंग्टन सुंदर याला पहिल्या दोन एकदिवस सामन्यात स्थान मिळाले आहे. तर, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांना विश्रांती दिली गेली असल्याने पहिल्या दोन सामन्यांत रवींद्र जाडेजा उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल.इशान किशन चांगल्याच फॉर्मात असल्याने तो ऑस्ट्रेलियाच्या संघाविरुद्ध आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतीच ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका २-३ने गमावली होती. किशनचा समावेश ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सर्व तीन सामन्यांसाठी करण्यात आला आहे. आशिया कपमध्ये ‘प्लेयर ऑफ द सीरीज’ ठरलेल्या कुलदीप यादव याला पहिल्या दोन सामन्यांमध्ये विश्रांती देण्यात आली आहे.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२, २४ आणि २७ सप्टेंबर रोजी अनुक्रमे मोहाली, इंदोर आणि राजकोट येथे एकदिवसीय सामने रंगतील.
हे ही वाचा:
इंग्लंडमध्ये चेतेश्वर पुजारा एका सामन्यासाठी निलंबित !
अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड उजैर खानचा खात्मा !
कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी !
तामिळ संगीतकार, अभिनेता विजय अँटनी यांच्या मुलीने केली आत्महत्या !
पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ
केएल राहुल (कर्णधार, यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा
तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज