अश्विन अघोर पंचत्त्वात विलीन

अश्विन अघोर पंचत्त्वात विलीन

आपल्या यूट्युब चॅनेलच्या माध्यमातून हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी विचार परखडपणे मांडणारे अश्विन अघोर यांचे शुक्रवारी निधन झाले. आज शनिवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य क्षेत्रातील अनेकजण उपस्थित होते. त्यांनी अघोर यांना श्रद्धांजली अर्पण केली. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव ठाणे पश्चिम येथील तुलसीदास त्रीनिटी सोसायटी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. तेथे त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन अनेकांनी घेतले.

अघोर यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्युमुळे हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या परिवाराचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त अनेकांनी व्यक्त केली. आपल्या अस्खलित वऱ्हाडी भाषेत अघोर हे ‘घनघोर’ हे यूट्युब चॅनेल चालवत होते. त्या माध्यमातून त्यांनी आपली सडेतोड मते व्यक्त केली होती. त्यांचा वेगळा प्रेक्षकवर्ग, श्रोतावर्ग तयार झाला होता. राजे हो, हे त्यांचे आवडते शब्द होते. तीच त्यांची ओळखही बनली होती.

हेही वाचा :

एपी फायबरनेट घोटाळ्यात चंद्रबाबू नायडू मुख्य आरोपी

पुण्येश्वर मंदिर हा पुणेकरांचा अधिकार  

ससूनमधून फरार झालेल्या कैद्याला अटक; ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती

युक्रेनचे अवदिवका शहर रशियाच्या ताब्यात

अघोर यांना यकृताच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते या आजारातून बरे होतील अशी आशा डॉक्टरांनीही व्यक्त केली होती. त्यांच्यावरील उपचारासाठी हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी विचारांच्या लोकांनी सढळहस्ते मदतही केली होती. मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पाठीशी सर्वांच्या सदिच्छाही होत्या. मात्र नियतीपुढे त्यांचे काही चालू शकले नाही. त्यांच्या अकाली जाण्याने हिंदुत्ववादी विचारांच्या एका मोठ्या वर्गाचे नुकसान झाले आहे अशी भावना व्यक्त करत अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Exit mobile version