आयपीएल २०२५च्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससाठी मध्यप्रदेशच्या रतलाममध्ये जन्मलेल्या २६ वर्षीय खेळाडू आशुतोष शर्माने तुफानी खेळी करत लखनौ सुपर जायंट्सच्या तोंडातून विजय खेचून आणला. एका टप्प्यावर सामना पूर्णपणे लखनौच्या ताब्यात दिसत होता. दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांना धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. मात्र, आशुतोषने आपल्या अप्रतिम खेळीच्या जोरावर शेवटच्या षटकात षटकार मारत दिल्लीला एका विकेटने शानदार विजय मिळवून दिला. त्यांच्या या झंझावाती खेळीमुळे त्यांना प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आशुतोष शर्माने विजयानंतर सांगितले, “मी हा पुरस्कार माझे गुरु शिखर (धवन) पाजींना समर्पित करू इच्छितो.” त्याने सांगितले की, त्याला फिनिशरची भूमिका निभावणे खूप आवडते आणि तो संघाला विजय मिळवून देऊ शकतो, याचा त्याला पूर्ण आत्मविश्वास होता.
टी-२० मध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम
आशुतोष शर्मा २०२३ मध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध केवळ ११ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकत भारतीय टी-२० इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावून चर्चेत आला होता. त्याने २०१८ मध्ये मध्यप्रदेश संघाकडून पदार्पण केले आणि २०२४ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डेब्यू केला. त्याच्या जबरदस्त बॉल-स्ट्राइकिंग कौशल्यामुळे पंजाब किंग्जने त्याला २० लाख रुपयांत विकत घेतले होते, जिथे त्याने काही महत्त्वपूर्ण खेळी केल्या. त्यांच्या या प्रभावी कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सने २०२५ मध्ये त्याला तब्बल ३.८ कोटी रुपयांत आपल्या संघात घेतले.
मॅच जिंकण्याचा आत्मविश्वास होता – आशुतोष शर्मा
दिल्लीकडून अर्धशतक ठोकणाऱ्या आशुतोषने सांगितले की, “सामना शेवटच्या षटकात गेला असताना आणि मोहित शर्माला पहिली चेंडू खेळायचा होता, तेव्हा मी अजिबात तणावात नव्हतो. मला खात्री होती की, जर मोहितने एक धाव घेतली, तर मी पुढच्या चेंडूवर षटकार मारू शकतो.”
२६ वर्षीय आशुतोष जेव्हा क्रीजवर आला, तेव्हा डीसीचा स्कोर ७व्या षटकात ६५/५ असा होता. आवश्यक रन रेट १०च्या आसपास होता आणि अर्धा संघ तंबूत परतला होता, त्यामुळे २१० धावांचे लक्ष्य गाठणे अशक्यप्राय वाटत होते.
हेही वाचा :
तेलंगणामध्ये काँग्रेसच्याच एका नेत्याकडे कोरटकर लपून होता!
कौंच बियाणे, कोलेस्टेरॉल कमी करण्यास फायदेशीर
शिवकुमार यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने माफी मागावी
कमजोरी, सर्दी-खोकल्यावर ‘च्यवनप्राश’चा प्रभावी उपाय
मात्र, जसा त्याने पंजाब किंग्जसाठी मागील मोसमात काही सामने जिंकून दिले होते, तसाच आक्रमक पवित्रा त्याने लखनौविरुद्धही दाखवला.
“मी फक्त मुलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करत होतो आणि माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवत होतो. मी संपूर्ण प्रक्रिया पाळत होतो. माझे उद्दिष्ट होते सामना शेवटपर्यंत न्यावा, जेणेकरून स्लॉग ओव्हर्समध्ये मोठे फटके मारता येतील,” असे आशुतोष म्हणाला.