संजय शिरसाट म्हणतात, अशोक चव्हाण भाजपात जातील!

लोकसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत

संजय शिरसाट म्हणतात, अशोक चव्हाण भाजपात जातील!

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे येत्या काळात भाजपामध्ये जातील अशा अटकळी गेल्या अनेक दिवसांपासून बांधल्या जात आहेत. आता शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी असा दावा केला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. ते भाजपामध्ये प्रवेश करतील अशा सध्या हालचाली सुरू असल्याचे शिरसाट म्हणत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या पहिल्या सभेत अशोक चव्हाण उपस्थित होते. पण तिथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित नव्हते. अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांचे एकमेकांशी पटत नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे पटोले यांच्या गैरहजेरीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. त्यातच शिरसाट यांनी चव्हाण हे भाजपामध्ये जातील असा ठाम दावा केला आहे.

हे ही वाचा:

चौथ्यांदा जीएसटी संकलनाने चौथ्यांदा केला १. ५ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार

पूर्व युक्रेनमध्ये रशियाच्या गोळीबारात सहा ठार, आठ जखमी

परब फिटनेसच्या निलेश दगडेचे ‘१००’ टक्के यश; मिळविला मुंबई श्री चा मान

…म्हणून आरोपीने न्यायाधीशांवर चप्पल भिरकावली

शिरसाट म्हणतात की, अशोक चव्हाण हे काँग्रेसचे एवढे मोठे नेते आहेत पण त्यांना योग्य वागणूक मिळत नाही. त्यामुळे ते भाजपाची वाट धरू शकतात. बाळासाहेब थोरात भाजपामध्ये जातील असा एक अंदाज गेल्या काही महिन्यात व्यक्त केला जात होता. विशेषतः नाशिकमधील शिक्षक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून बरीच चर्चा झाली होती. तेव्हा बाळासाहेब थोरात नाराज असल्याचे समोर येत होते. पण सध्या भाजपामध्ये विखे पाटील असल्यामुळे थोरात भाजपात येणार नाही, असे शिरसाट म्हणतात. मात्र अशोक चव्हाण यांनी ती मानसिकता तयार केली आहे.

सुषमा अंधारे यांच्याबाबतही शिरसाट म्हणाले की, त्या प्रसिद्धीसाठी काहीही करतात. त्यांनी जिथे जायचे तिथे चौकशीसाठी जाऊ द्या. महिला आयोगाकडे जाऊद्या, पोलिसात जाऊ द्या एकदा काय व्हायचं ते होऊ द्या.

Exit mobile version