ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ६०व्या वर्षी दुसरा विवाह केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बाबत त्यांची पहिली पत्नी राजोश बरुआ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आशिष विद्यार्थीने आपली कधीही फसवणूक केली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी याने नुकतेच त्यांच्या लग्नाच्या बातमीने सर्वांना चकित केले. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी दुसरे लग्न केले. त्यांनी रुपाली बरुआ यांच्याशी विवाह केला. आशिष यांचा आधी राजोशी बरुआशी विवाह झाला होता आणि त्यांना अर्थ हा मुलगा आहे. आशिषच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर पसरल्यानंतर त्याची पहिली पत्नी राजोशीने त्यांच्या घटस्फोटाबद्दल खुलासा केला.
हे ही वाचा:
मंदिर हे पर्यटन स्थळ, म्युझियम नाही
पाण्यात पडलेला फोन काढण्यासाठी २१ लाख लीटर पाणी काढून टाकले, अधिकारी निलंबित
एनआयएने केली यासिन मलिकच्या फाशीची मागणी
संसद भवन उद्घाटनासाठी ७५ रुपयांचे खास नाणे !
त्यांनी ऑक्टोबर २०२२मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आणि हा निर्णय परस्पर होता, असे स्पष्टीकरण राजोशी यांनी दिले आहे. “गेल्या वर्षी, ऑक्टोबरमध्ये आम्ही एकत्र याचिका दाखल केली. कोणीही कोणाला धक्का दिला नाही. हे पूर्णपणे परस्पर होते. मी शकुंतला बरुआ यांची मुलगी आणि आशिष विद्यार्थी यांची पत्नी म्हणून माझ्या आयुष्यातील बराच काळ घालवला आहे. आता वेळ आली आहे की, मला माझ्या वाटेवर एकट्याने चालायचे आहे. मला माझी स्वतःची ओळख हवी आहे आणि फक्त स्पष्टपणे सांगायचे आहे की, त्याने माझी ओळख कधीच पुसली नाही. मला आत्ताच जाणवले की तो एक वेगळे भविष्य पाहत आहे, मी वेगळे पाहात आहे,’ असे त्या म्हणाल्या.
‘आम्ही सदैव मित्र राहू’
जरी हे दोघे वेगळे झाले असले तरी राजोशी आणि आशिषने मित्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या प्रार्थना आणि शुभेच्छा नेहमीच त्याच्यासोबत असतील, असे राजोशी यांनी म्हटले आहे.