प्रतिष्ठेची मानली जाणारी मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक २० ऑक्टोबर रोजी होणार होत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल केला असल्याने या निवडणुकीच्या लढतीची रंगत वाढणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाकडून भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि माजी निवड समिती प्रमुख संदीप पाटील यांनी देखील अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे.
आशिष शेलार यांनी २०१७ वर्षांपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवले होते. आता पुन्हा ते रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता राजकारणी आणि क्रिकेटपटू अशी लढत बघायला मिळणार आहे. कार्यक्रमानुसार, एमसीए सर्वोच्च परिषदेच्या निवडून आलेल्या प्रत्येकी १४ सदस्यांसाठी २० ऑक्टोबर रोजी वानखेडे स्टेडियमच्या आवारात मतदान आणि मतमोजणी होणार आहे.
६ ते १० ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, तर उमेदवारांची अंतिम यादी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी घोषणा केली जाईल. निवडणुकीसाठी मतदारांची यादी दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली आहे.
हे ही वाचा:
ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल
चिन्हं, नाव गोठवल्यावरही ठाकरेंचे गद्दार, खोकासूर, मिंधे गट सुरूच
उद्धव ठाकरेंना दिलेल्या ४ हजार ६८२ प्रतिज्ञापत्रावर बनावट रबर स्टॅम्पचा वापर
अरुण गोविल काय म्हणाले ‘आदिपुरुष’ बद्दल
शेलार यांच्याकडे पारसी पायोनियर क्लबची मालकी आहे. आधी या क्लबची मालकी रमांकात आचरेकर सरांच्या कुटुंबियांकडे होती. दोन आठवड्यांपूर्वी आशिष शेलारांनी हा क्लब आचरेकर कुटुंबियांकडून विकत घेतला. शरद पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून पारसी पायेनियर क्लबकडून मतदान करत आहेत. पण आता यावेळेला त्यांना शेलारांच्या क्लबसाठी मतदान करावं लागणार आहे.