दरवर्षी मुंबईकरांना नालेसफाईच्या कारणांमुळे पावसाळ्यातील पाणी तुंबण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. दरम्यान यावर्षी, मुंबई महापालिकेने मार्च महिन्यापासून पावसाळ्यापूर्वी आवश्यक नालेसफाईची कामे सुरू केली आहेत. आतापर्यंत ७५ टक्के नालेसफाईची कामे झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, प्रत्यक्षात नालेसफाई कुठे व कशी करण्यात आली आहे, नालेसफाई किती टक्के झाली, गाळ कसा काढला जात आहे, गाळ कुठे टाकला जातोय या सर्व बाबींची झाडाझडती घेण्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे १२ मे रोजी पश्चिम उपनगरातील नालेसफाई कामांची पाहणी केली.
आशिष शेलार यांनी खार, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरातील नाल्यांची भागाची पाहणी केली. या नालेसफाई कामाच्या पाहणी दौऱ्यात भाजपचे आमदार अमित साटम, आमदार भारती लवेकर, भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा, समन्वयक व प्रवक्ता भालचंद्र शिरसाट आणि पश्चिम उपनगरांतील भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आदी सहभागी होते. त्यावेळी आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर टीका केली ते म्हणाले, पावसाच्या पाण्याचा निचरा वेवस्थित व्हावा याची अपेक्षा वर्षानुवर्षे मुंबईकरांना आहे.
हेही वाचा :
“नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ही चूक”
“सुषमा अंधारेंनी शरद पवारांऐवजी ठाकरेंसमोर रडावं”
वाढताहेत उन्हाच्या झळा, मुंबईकरांनो पुढील दोन दिवस तब्येत सांभाळा!
इम्रान खान यांना दिलासा, पण भविष्य अंध:कारमय
गेल्या २५ वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाने या सगळ्या गोष्टींकडे संपूर्णतः दुर्लक्ष केल्याने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, या कारणांमुळे आम्ही अधिकारांसमवेत नाले सफाईची पाहणी करत आहोत. नाले-सफाईबाबत मुंबई महापालिकाकडून जे दावे केले जात आहेत ते सर्व कंत्राटांच्या जीवावर केले जात आहेत.ते पुढे म्हणाले, मुंबईच्या नाल्यांच्या सफाईचा खर्च हा २८० करोडच्या वर आहे.या कामासाठी नेमण्यात आलेले कंत्राटदार हे उद्धव ठाकरेंच्या काळातलेच आहेत तसेच त्यांच्या पक्षांच्या जवळचे कंत्राटदार आहेत.त्यामुळे आमचा आणि मुंबईकरांचा यांच्यावर आता भरोसा नाही.
ज्या पद्धतीने महानगरपालिके कडून ८० टक्के ९० टक्के नाले साफ केल्याचे आकडे सांगण्यात येत आहेत ते संपूर्णतः चुकीचे आणि असमाधानी काम आहे तसेच नाले सफाईत निष्काळजीपणा करत असल्याचे, शेलार म्हणाले. नाले सफाई करताना एका नाल्यातून किती टक्के गाळ निघतो, त्याची टक्केवारी आणि मोजमाप केले जाते. त्या मोजमापात हे कंत्राटदार हात चलाखी करत आहेत आणि हे कंत्राटदार उद्धव ठाकरेंचे जवळचे कंत्राटदार आहेत.त्यामुळे गाळ मोजणीत करण्यात आलेला भ्रष्टाचार आणि त्यातून असमाधानकारक असेलेली व्यवस्था यावर चाबूक घेऊन असलेला भारतीय जनता पार्टी पक्ष मुंबईकरांना सेवा देण्याचं काम करेल, असे आशिष शेलार म्हणाले.