कुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्ता आशाने ३ शावकांना दिला जन्म!

तीन लहान शावकांसह चित्तांची संख्या १८ वर

कुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्ता आशाने ३ शावकांना दिला जन्म!

नवीन वर्षाच्या सुरवातीलाच मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून आनंदाची बातमी समोर आली आहे.कुनो पार्कमधील आशा या मादी चित्ताने तीन पिल्लांना जन्म दिला आहे. तीनही पिल्ले निरोगी असल्याची माहिती आहे.

१७ सप्टेंबर २०२२ रोजी नामिबियातून कुनो राष्ट्रीय उद्यानात ८ चित्ते आणण्यात आले होते.यातील मादी चित्ता आशाने तीन पिल्लांना जन्म दिला आहे.आता उद्यानातील चित्ता आणि पिल्लांची एकूण संख्या १८ वर पोहचली आहे.केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनीही कुनो नॅशनल पार्कमध्ये जन्मलेल्या तीन पिल्लांचा व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओमध्ये तीनही पिल्ले सुदृढ आणि फिरताना दिसत आहेत.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत लिहिले की, जंगलात म्याऊ, कुनो नॅशनल पार्कमध्ये तीन नवीन सदस्यांचे स्वागत झाले आहे.हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे.नामिबियातून आणलेल्या मादी चित्ताने या पिल्लांना जन्म दिला आहे.देशात सुरु झालेल्या चित्ता प्रकल्पाचे हे मोठे यश असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे.

हे ही वाचा:

केपटाऊनच्या मैदानात ‘राम सिया राम’ गाणं वाजताच विराट कोहलीने जोडले हात

‘पीएपी’ मधील ‘प्रसाद’ पवारांनाही मिळाला!

ओडिशाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार!

‘रामजींना एकटे ठेवू नका’, रामायणातील सीतेने पंतप्रधानांना केली विनंती!

कुनो पार्कमध्ये सध्या १४ चित्ते आहेत.आता तीन लहान शावकांसह ही संख्या १८ वर गेली आहे.यामध्ये गौरव,वायू,अग्नी, पवन, प्रभास, आणि पावक या ७ नर चित्ताचा समावेश आहे.तर आशा, गामिनी,नभा,धीरा,ज्वाला,निर्वा आणि वीरा या ७ मादी चित्ताचा समावेश आहे.यापैकी केवळ दोनच चित्ते मोकळ्या जंगलात असून ते पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना पाहता येतात तर उर्वरित सर्वे चित्ते मोठ्या बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत. आता या तीन लहान शावकांसह एकूण संख्या १८ वर पोहचली आहे.

दरम्यान, भारतातील चित्ता प्रकल्पाला चालना देण्यासाठी नामिबियातून चित्ते येथे आणण्यात आले होते.भारतात चित्ता पूर्णपणे नामशेष झाला होता.त्यानंतर नामिबियातून प्रथम ८ चित्ते आणण्यात आले आणि त्यानंतर १८ फेब्रुवारी २०२३ रोजी दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते आणले.कुनो उद्यानात आतापर्यंत ६ चित्ते मरण पावले आहेत.मात्र, आता तीन पिल्ले जन्माला आल्यानंतर जंगलात चित्तांची संख्या वाढली आहे.

Exit mobile version