आशा, गामिनी, प्रभासला सोडले जंगलात !

कुनो अभयारण्यातल्या चित्त्यांची तपासणीनंतर रवानगी

आशा, गामिनी, प्रभासला सोडले जंगलात !

कुनो नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात आलेल्या जंगलातील सर्व चित्यांना आरोग्य तपासणीसाठी क्वारंटाईन एन्क्लोजरमध्ये ठेवण्यात आले होते.१७ सप्टेंबरपासून चित्यांची आरोग्य तपासणी सुरु आहे, त्यातील ७ चित्यांची आरोग्य तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना शिस्तबद्ध पद्धतीने जंगलात सोडण्यात आले असून सोडण्यात आलेले चित्ते पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगण्यात आले आहे.

मध्यप्रदेशातील श्योपूर येथील कुनो नॅशनल पार्कमधील अनेक चित्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी क्वारंटाईन करण्यात चित्यांना आता मुक्त संचार करण्यासाठी मोठ्या आवारात (जंगलात) सोडण्याची तयारी सुरु झाली आहे. गौरव, शौर्य, अग्नी आणि वायु यांच्यानंतर आता आशा गामिनी आणि प्रभास नावाच्या चित्यांना मोठ्या बंदिस्तात सोडण्यात आले आहे. त्यामुळॆ आता त्यांची संख्या ४ वरून ७ इतकी झाली आहे.शावकांसह ८ चित्ते अजूनही क्वारंटाईन असून त्यांनाही लवकरच जंगलात सोडले जाणार आहे.

हे ही वाचा:

कॅनडाला भारताशी पंगा भारी पडणार; आर्थिक फटका बसण्याची शक्यता

कॅनडातल्या भारतीयांनो खबरदारी घ्या…भारताकडून आवाहन

अमेरिकेतले संसद सदस्य फेटरमन आले चक्क हाफ पॅन्टमध्ये !

३५ हजाराहून अधिक महिलांकडून अथर्वशीर्षाचे पठण

कुनो पार्क व्यवस्थापकाकडून मंगळवारी सायंकाळी ३ चित्यांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली यामध्ये आशा आणि गामिनी या २ मादी एक नर चित्ता प्रभास याचा समावेश आहे.या तिघांना सोडण्यापूर्वी सॅटेलाईट कॉलर लावण्यात आले आहे.

पीसीसीएफ वन्यजीव वॉर्डन असीम श्रीवास्तव हे म्हणाले, कुनो पार्क मधील सर्व चित्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी त्यांना क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता ७ चित्यांची तपासणी झाली असून ते पूर्णपणे निरोगी असल्याचे खात्री करून त्यांना जंगलात सोडण्यात आले आहे.पार्क मधील पसरलेल्या रोगामुळे तसेच चित्यांचा परस्परांतील संघर्ष , त्वचेचा संसर्ग रोग अशा विविध कारणांमुळे चित्यांचा मृत्यू झाला होता.त्यानंतर मुक्तपणे जंगलात संचार करण्याऱ्या चित्यांना पकडून क्वारंटाईन करून त्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.आता त्यांना प्रथमतः बंदिस्त जंगलात सोडले जाईल त्यानंतर मोठ्या जंगलात सोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.कुनो राष्ट्रीय उद्यानात सध्या एकूण १५ चित्ते आहेत. यामध्ये नामिबियातून आणलेल्या 6 चित्ते आहेत तसेच दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या ८ चित्यांचा यामध्ये समावेश आहे.याशिवाय १ शावक मादी आहे जिने भारतीय भूमीवर जन्म घेतला आहे.

Exit mobile version