ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
आशा भोसले या मंगेशकर कुटुंबात जन्माला आल्या. वडील दीनानाथ मंगेशकर हे स्वतः गायक आणि संगीतकार असल्यामुळे घरातच त्यांना गायनाचं बाळकडू मिळालं. लता मंगेशकर, उषा मंगेशकर आणि भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांच्याबरोबर एकाच घरात आशा भोसलेही गायन शिकल्या. आशा भोसले यांनी १९५० च्या दशकापासूनच पार्श्व गायन सुरु केले. गेली जवळपास ७० वर्षे त्या विविध सिनेमांमध्ये पार्श्व गायन करत आहेत.
हे ही वाचा:
वाझेच्या कोठडीत दहा दिवसांची वाढ
तर आम्ही चार पाकिस्तान बनवू- तृणमूल नेता
सचिन वाझे विरोधात खंडणीची तक्रार
निर्लज्ज राहुल गांधी महिला- बुजुर्ग सन्मानाच्या बाता मारतायत
आशा भोसले यांचं संगीत क्षेत्रात मोठं योगदान आहे. त्यांनी असंख्य मराठी आणि हिंदी गाणी गायली आहेत. प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन कर्रिकेटर ब्रेट ली सोबतही त्यांनी एक गाण्यांचा अल्बम बनवला आहे. २०२० साली त्यांनी स्वतःचा यूट्यूब चॅनेलही सुरु केला. या चॅनेलचं नाव आशा भोसले ऑफिशियल असे आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निवडीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.