‘असदुद्दीन ओवेसींकडून मुस्लिमांना भडकवण्याचे काम’

मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांचे वक्तव्य

‘असदुद्दीन ओवेसींकडून मुस्लिमांना भडकवण्याचे काम’

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी तिरुपती बालाजी मंदिर आणि वक्फ दुरुस्ती विधेयक यावर दिलेल्या प्रतिक्रियेवर बरेलीचे मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ओवेसी मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना मुस्लिमांची दिशाभूल करून स्वतःचे भवितव्य घडवायचे आहे, अशी टीका मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी केली आहे.

ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी म्हणाले की, वक्फ बोर्डात एकही बिगर मुस्लिम नाही. त्यामुळे ओवेसी यांनी अशी विधाने करू नयेत. जे वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करत आहेत. अशा लोकांनी वक्फच्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. वक्फ मालमत्तेचे योग्य सर्वेक्षण करून त्याचा योग्य वापर केला तर भारतातील एकही मुस्लिम भीक मागणार नाही. कोणताही मुस्लिम गरीब राहणार नाही, असे मौलाना बरेलवी म्हणाले.

ओवेसींना मुस्लिमांना भडकावायचे आहे आणि त्यांना रस्त्यावर आणायचे आहे. मुस्लिमांनी तुरुंगात आंदोलन करावे अशी त्यांची इच्छा आहे. वक्फ विधेयकात पहिल्यांदाच दुरुस्ती केली जात नाही, याआधीही त्यात अनेक वेळा दुरुस्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राज्यघटनेतही वेळोवेळी अनेक वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वक्फ दुरुस्ती विधेयक आणल्याने गरीब मुस्लिमांना फायदा होणार असल्याचे मौलाना बरेलवी यांनी म्हटले.

हे ही वाचा :

‘योगी आदित्यनाथ १० दिवसात राजीनामा द्या, अन्यथा बाबा सिद्दिकी सारखी हत्या करू’

केंद्रीय गृहमंत्र्यांवरील आरोपांप्रकरणी भारताने कॅनडाच्या अधिकाऱ्याला बजावले समन्स

दुबईहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात सापडली काडतुसे

जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

दरम्यान, वक्फ बोर्ड आणि तिरुमला बोर्डाबाबत असदुद्दीन ओवेसी म्हणाले होते की, एकीकडे टीटीडी बोर्डात एकाही अहिंदूला न ठेवण्याची चर्चा आहे. दुसरीकडे मोदी सरकार वक्फ बोर्ड कौन्सिलमध्ये दोन बिगर हिंदूंना ठेवण्याची तरतूद आणत आहे. ते पुढे म्हणाले, टीटीडी हे हिंदू धर्माचे बोर्ड आहे आणि वक्फ हे मुस्लिमांचे बोर्ड आहे.

Exit mobile version