32 C
Mumbai
Friday, October 18, 2024
घरविशेषअसदुद्दीन ओवेसींकडून इस्रायली पंतप्रधानांचा ‘सैतान’ उल्लेख!

असदुद्दीन ओवेसींकडून इस्रायली पंतप्रधानांचा ‘सैतान’ उल्लेख!

पंतप्रधान नरेंद्र मोदींना गाझासोबत उभे राहण्याचे आवाहन

Google News Follow

Related

एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी इस्रायली पंतप्रधानांचा ‘सैतान’ उल्लेख केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझामधील लोकांशी एकता दाखवावी तसेच इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात हजारो लोक मरण पावले असून असंख्य लोक जखमी झाले आहेत, त्यांना मदत करावी असे आवाहन असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींना केले आहे.

“मी पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभा आहे आणि यापुढेही उभा राहीन. आजही इस्रायलविरोधात लढणाऱ्या गाझातील लाखो शूरवीरांना माझा सलाम! नेतान्याहू (इस्रायली पंतप्रधान) हा एक जुलमी सैतान आणि युद्ध गुन्हेगार आहे. आपल्या देशातील एक बाबा मुख्यमंत्री (योगी आदित्यनाथ) म्हणाले की, पॅलेस्टाईनचे नाव घेणाऱ्यांवर खटले दाखल केले जातील. तर मी त्या बाबा मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, मी आपल्या तिरंग्यासह अभिमानाने पॅलेस्टाईनचा झेंडाही धारण करतो. मी पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभा आहे,” असं विधान ओवेसी यांनी केलं. ते हैदराबाद येथील जाहीर सभेत बोलत होते.

हे ही वाचा:

बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे ५० ठिकाणी छापे

इतिहास घडणार; छत्तीसगडमध्ये ‘बुलेट’वर ‘बॅलेट’चे यश

विराट कोहलीने बाबरला दिली स्वाक्षरी केलेली जर्सी!

ईडीचे अधिकारी असल्याचे सांगत तीन कोटींची लूट!

“मला पंतप्रधानांना पॅलेस्टिनींवर होणारे अत्याचार थांबवण्याचं आवाहन करायचं आहे. पॅलेस्टाईन हा केवळ मुस्लिमांचा प्रश्न नाही, तो एक मानवतावादी मुद्दा आहे. २१ लाख लोकसंख्या असलेल्या गाझातील १० लाख गरीब लोक बेघर झाले आहेत. पण जग शांत आहे. ७० वर्षांपासून इस्रायल पॅलेस्टाईनवर ताबा मिळवत आहे. इस्रालयने केलेला ताबा तुम्हाला दिसत नाहीये का? पॅलेस्टिनींवरील अत्याचार तुम्हाला दिसत नाहीत का? ” असंही असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

हमासने शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी ‘ऑपरेशन अल अक्सा फ्लड बॅटल’ची घोषणा करत इस्रायलवर हल्ला चढवला होता. याचा बदला म्हणून इस्रायलने ‘ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स’ची घोषणा केली. हमास-इस्रायलच्या युद्धात दोन्ही देशातील ३२०० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. तर गाझा पट्टीत १९०० पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला असून यामध्ये सुमारे ७०० लहान मुलं असल्याचं ‘युनिसेफ’कडून सांगण्यात आला आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
183,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा