कोरोना महामारीत गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. त्यामुळे शाळांमध्ये कधी माकडांचे तर कधी अनेक कीटकांचे साम्राज्य होते. मात्र घाटकोपरच्या एका शाळेत तर एक सापच शाळेमध्ये ठाण मांडून बसला होता.
घाटकोपर मधील गुरु नानक इंग्लिश हायस्कूलमध्ये महामारीनंतर शाळा स्वच्छ करण्याचे काम सुरु होते. एका कर्मचार्याने रिकाम्या वर्गाचे दार उघडले तेव्हा तिला एका बाकावर साप दिसला.अडीच फूट लांब असा हा बिनविषारी साप होता. ती लगेच मागे हटली आणि घाईघाईने खोलीतून निघून गेली. लॉकडाऊन लागू झाल्यापासून दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने परीक्षा द्यायच्या असल्याने शाळेची साफसफाई सुरू होती. नंतर, शाळेने सापाला वाचवण्यासाठी मदतीकरता एनजीओ रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअरशी संपर्क साधला.
जेव्हा हे बचाव पथक शाळेत पोहचले तेव्हा त्या वर्गात साप नव्हता. त्यानंतर वर्गात शोधाशोध केल्यानंतर शेवटच्या बाकाच्या खालच्या कप्प्यात साप जाऊन बसला होता. पथकाने त्या सापाची सुखरूप सुटका केली. मात्र शाळेचे दरवाजे खिडक्या बंद आणि छतही प्लास्टरचे असूनही हा साप आत आला कसा हा प्रश्न सर्वाना पडला आहे. या शाळेच्या इमारतीला लागूनच खारफुटी असलेली खाडी आहे. या खाडीतून साप शाळेत आला असेल बोलले जात आहे.
हे ही वाचा:
‘शरद पवारांचं आडनाव बदलून आगलावे ठेवा’
कोरोना काळात विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार
‘ड्रेनेजचं झाकण ‘त्या’ गायीनेचं बाजूला केलं आणि पडली’
बंगाल विधानसभेत ठोसे, शर्ट फाटेपर्यंत मारामारी
लॉकडाऊनच्या काळात अनेक शाळा महाविद्यालये बंद होती. त्यामुळे अनेक वन्यप्राण्यांनी बंद जागा त्यांचे घर बनवले होते. उद्याने बंद असताना अनेक माकडे प्राणी मनुष्य वस्तीत घुसल्याच्याही बातम्या आल्या होत्या.