23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषनिवडणूक संचालन समितीच्या समन्वयकपदी आ. अतुल भातखळकर

निवडणूक संचालन समितीच्या समन्वयकपदी आ. अतुल भातखळकर

मुंबईच्या सहाही जागा जिंकण्याचा निर्धार, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची उपस्थिती

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिशन ‘महाविजय २०२४’ अंतर्गत मुंबई भाजपा लोकसभा निवडणूक संचालन समितीची पहिली बैठक केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत निवडणूक संचालन समितीचे समन्वयक म्हणून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांची नियुक्ती करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार होते. दादरच्या मुंबई भाजपा कार्यालयात बुधवारी हि बैठक पार पडली. मुंबईच्या सहाही जागा जिंकण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

बैठकीला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, खा. पूनम महाजन, आ. प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपा आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईमधील सर्वच्या सर्व लोकसभेच्या जागा जिंकण्याच्या अनुषंगाने मुंबई लोकसभा निवडणूक समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष आ. आशिष शेलार हे असून आ. अतुल भातखळकर संयोजक, तर संजय उपाध्याय, आ. सुनील राणे, आ.अमित साटम आणि आ. योगेश सागर यांना सह- संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा..

भारतातील सर्वात वयोवृद्ध सरिस्काची वाघीण ‘राजमाताचा’ मृत्यू!

अहो आश्चर्यच ! राजीव गांधी यांच्या हातातून चक्क रक्त येऊ लागले

मोदी युग भारताला वैभवाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल

हाफिज सईद पाकिस्तानच्या तुरुंगातला कैदी; भोगतोय ७८ वर्षांची शिक्षा

त्याशिवाय विविध प्रकारचे ३६ विभाग तयार करण्यात आले आहेत. त्याची जबाबदारी अंतर्गत पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. मोदी सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. ही विकासकामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये लोकसभा मतदारसंघाचा आढावा सुरू आहे. लोकसभा, विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. तसेच संघटनात्मक बांधणीवर जोर दिला जात आहे. बुथ समित्या अधिक सक्षम करून पक्षाने दिलेले कार्यक्रम अधिक व्यापक नियोजन करुन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले जात आहे. आज प्रथम संयोजन समितीची बैठक झाली. त्यानंतर या समितीच्या कोअर ग्रुपने मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघाचा त्या मतदार संघाचे खासदार, आमदार आणि जिल्हा अध्यक्ष, महामंत्री यांच्याकडून आढावा घेतला.

टिफिन बैठक

आजच्या बैठकीला सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार स्वतः च्या घरुन जेवणचा डबा घेऊन आले होते. मुख्य आढावा बैठक झाल्यानंतर मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात टिफिन बैठकही पार पडली. प्रत्येकाने आणलेले पदार्थ एकमेकांना देऊन सहभोजनाचा आनंद यावेळी घेण्यात आला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा