लोकसभेचे तिकीट मिळताच छत्रपती संभाजी नगर येथील वंचितच्या उमेदवाराने औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आहे.वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी खुलताबाद येथे जाऊन औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली आहेत.उमेदवाराच्या कृत्याने आता पुन्हा राजकीय वाद उद्भवनाची शक्यता आहे.
गेली अनेक वर्षे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये ‘खान की बाण’ असे राजकरण सातत्याने चाललेलं आहे.हिंदू-मुस्लिम असे मतांचे ध्रुवीयकरण करून आपली राजकीय पोळी भाजण्याच्या चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांनी आज खुलताबाद येथे जाऊन औरंगजेबाच्या कबरीवर फुलमाला अर्पण केली आहे.त्यामुळे आता पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ म्हणतो, मी झाडली सलमानच्या घरावर गोळी!
इंडी आघाडीचा जाहीरनामा देशाला दिवाळखोर बनवणारा
विम्याच्या पैशांसाठी फारुकने कुटुंबाच्या साथीने केली मानसिकदृष्ट्या विकलांगाची हत्या
बेंगळुरू स्फोटातील आरोपी अब्दुल ताहा बनला विघ्नेश आणि अनमोल कुलकर्णी
यापूर्वी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती.त्यावरून देखील बराच वाद निर्माण झाला होता.त्यातच लोकसभेचे तिकीट मिळताच अफसर खान यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन भेट दिली आणि कबरीवर फुले वाहिली.आता पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती झाल्याने वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.