महाराष्ट्रात रेल्वेसाठी १५ हजार ९४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यात नवे रेल्वेमार्ग, मार्गांचे दुपदरीकरण, तीनपदरीकरण या कामांसाठी ८ हजार ५८१ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय गतिशक्ती, मल्टिमोडल टर्मिनल, रेल्वेस्थानके या कामांसाठी १ लाख ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. दरवर्षी राज्यात १८० किलोमीटरचे नवे रेल्वेमार्ग तयार होत असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
रेल्वे मंत्री वैष्णव म्हणाले, राज्यातल्या सर्व रेल्वे स्थानकांचे १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. अमृत स्थानक योजनेअंतर्गत राज्यातल्या १२८ रेल्वेस्थानकांचे पूर्ण नूतनीकरण केले जात असून गेल्या १० वर्षांत २९२ उड्डाणपूल, भुयारी मार्गांचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे या मार्गावरील शहरांच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे.
हेही वाचा..
ॲमेझॉनवरून मागवला एअर फ्रायर, मिळाला ‘सरडा’ !
मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओव्हर फ्लो!
इस्लामिक सेंटर हॅम्बर्गवर जर्मनीने घातली बंदी !
दुर्गतपस्वी, ज्येष्ठ इतिहास संकलक अप्पा परब यांना ‘शिवसन्मान पुरस्कार’ !
बांद्रा-कुर्ला संकुलातील स्थानक भूमिगत असून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून ते उभारण्याचे काम सुरू आहे. ठाण्याच्या खाडीचा २१ किलोमीटरचा टप्पा समुद्राखालून जाणारा असून त्यानंतरचा टप्पा उंचीवर जाणारा आहे. हा मार्ग एकंदर ५०८ किलोमीटरचा असून यापैकी ३२० किलोमीटर टप्प्यात पाया, खांब आणि त्यावरचा भाग बांधण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. हा प्रकल्प २०३६पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील दोन उपनगरीय रेल्वेमधील अंतर १८० सेकंदांवरून कमी करून १५० सेकंदांवर आणण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. बाहेरच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची ४ मेगा टर्मिनल तयार होणार असून कोस्टल रोड, मेट्रोमुळे उपनगरीय रेल्वेवरचा भार मोठ्या प्रमाणात कमी होईल, असेही मंत्री वैष्णव यांनी सांगितले.