हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज १२ वी पुण्यतिथी. मुंबईसह राज्यभरातील नेतेमंडळी आणि शिवसैनिक मुंबईतील शिवाजी पार्क मैदानातील समाधीस्थळी जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहत आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या पत्नीसह सकाळी बाळासाहेबांच्या समाधीस्थळी भेट दिली. याच दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ट्वीटकरत बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीटकरत लिहिले, बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या १२व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. माझे विचार उद्धव ठाकरे, आदित्य आणि संपूर्ण शिवसेना परिवारासोबत आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले. दरम्यान, राहुल गांधी यांनी बाळासाहेबांना आदरांजली तर वाहिली. मात्र, त्यांना १२ वर्षानंतर जाग आली का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, राहुल गांधी यांच्यातोंडून आतापर्यंत बाळासाहेबांबाबत कोणत्याही गोष्टी अथवा कौतुक केल्याचे समोर आलेले नाही.
हे ही वाचा :
पत्रकार हे मालकांचे गुलाम, राहुल गांधी यांनी पत्रकारांना दाखवली जागा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नायजेरियात स्वागत
काँग्रेस, राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे कधीही कौतुक केले नाही, असा दावा भाजपाने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचारसभेत अनेक ठिकाणी याबाबत उल्लेख केला आहे. काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंची स्तुती करावी, असे आव्हानही त्यांनी दिले होते. आजपर्यंत काँग्रेस तसेच काँग्रेसचे शहजादे (राहुल गांधी) यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा गैरव केलेला नाही,” असे मोदी म्हणाले होते. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आव्हानामुळे कदाचित राहुल गांधींनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली असावी, असा सवाल उपस्थित होत आहे.
Remembering Balasaheb Thackeray ji on his 12th death anniversary. My thoughts are with Uddhav Thackeray ji, Aditya and the entire Shiv Sena family.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 17, 2024