संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी तब्बल ३३ विरोधी पक्षातील खासदारांना उर्वरित कालावधीसाठी लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. या निलंबनाबद्दल बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, सदस्यांचे निलंबन हे केवळ आणि केवळ सभागृहाचे पावित्र्य राखण्यासाठी केले आहे.
काही दिवसांपूर्वी संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याबद्दल विरोधी खासदारांनी सतत निषेध केला होता. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणात निवेदन करण्याची मागणीही केली होती. निलंबित खासदारांमध्ये कॉंग्रेसचे अधीर रंजन चौधरी, डीएमकेचे खासदार टी. आर. बालू आणि दयानिधी मारन तसेच टीएमसीचे सौगता रॉय यांचा समावेश आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवारी काही सदस्यांना निलंबित करण्याचा सभागृहाचा निर्णय आणि संसदेच्या सुरक्षा भंगाच्या घटनेतील संबंध नाकारला आहे.निलंबित करण्यात आलेल्या ३३ पैकी ३१ जणांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजासाठी निलंबित करण्यात आले आहे. तर विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत तिघांना निलंबित करण्यात आले आहे. जयकुमार, विजय वसंत आणि अब्दुल खलेक अशी त्यांची नावे आहेत. हे तिघे खासदार घोषणाबाजी करण्यासाठी सभापतींच्या व्यासपीठावर चढले होते.
हेही वाचा..
मंत्रिपद आहे तोपर्यंत चालक विरहित गाडी नाही!
ज्ञानवापी मशीद संकुलातील वैज्ञानिक सर्वेक्षण अहवाल न्यायालयात सादर
एनआयएची राज्यात छापेमारी, एक तरुण ताब्यात!
मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वंकष प्रयत्न
या खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सभागृहात मांडला. नंतर आवाजी मतदानाने तो मंजूर करण्यात आला. दरम्यान संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी केलेल्या निदर्शनेमुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. याशिवाय संसदेच्या सुरक्षा भंगानंतर १४ डिसेंबर रोजी १३ लोकसभा खासदार आणि एका राज्यसभेच्या खासदाराला संसदेत ‘अनियमित वर्तन’ केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. लोकसभेतून निलंबित करण्यात आलेल्या संसद सदस्यांमध्ये मणिकम टागोर, कनिमोझी, पीआर नटराजन, व्हीके श्रीकांदन, बेनी बहनन, के. सुब्रमण्यम, एस. वेंकटेशन आणि मोहम्मद जावेद यांचा समावेश आहे. तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन हे राज्यसभेतून निलंबित झालेले एकमेव खासदार आहेत. राज्यसभेच्या एका खासदारासह ४७ विरोधी खासदारांना उर्वरित खासदारांना हिवाळी अधिवेशनासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे.