राम मंदिरातील पुजारी पदासाठी आले तब्बल ३ हजार अर्ज!

अद्याप ट्रस्टकडून २०० उमेदवारांची निवड, शेवटी २० उमेदवार होणार कामावर रुजू

राम मंदिरातील पुजारी पदासाठी आले तब्बल ३ हजार अर्ज!

अयोध्येतील राम मंदिराच्या पुजारी पदासाठी सुमारे ३ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत.श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून रिक्त पदासाठी जाहिरात करण्यात आली होती.ट्रस्टने मुलाखतीसाठी गुणवत्तेच्या आधारावर २०० उमेदवारांची निवड केली आहे.निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची मुलाखत मंदिरातील कारसेवकपुरम येथे होणार आहे.

मुलाखत पॅनलमध्ये तीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे.मुलाखत पॅनेलमध्ये वृंदावन येथील हिंदू धर्मोपदेशक जयकांत मिश्रा आणि अयोध्येतील दोन महंत – मिथिलेश नंदिनी शरण आणि सत्यनारायण दास यांचा समावेश करण्यात आला आहे.मुलाखतीसाठी पात्र झालेल्या या २०० उमेदवारांमधून ट्रस्ट शेवटी २० उमेदवारांची निवड करणार आहे.या २० उमेदवारांना कामावर रुजू करण्यात येणार आहे.निवडलेल्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या निवासी प्रशिक्षणानंतर रामजन्मभूमी संकुलातील विविध पदांवर पुजारी म्हणून नियुक्त केले जाईल.

हे ही वाचा:

खर्गे म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी देशासाठी प्राण दिले’!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी सूर्यकुमार कर्णधार!

इस्रायलकडून युद्धविराम झाला नाही तर असेच होणार अपहरण!

विधानसभेत जबाब नोंदविण्यासाठी पहिल्यांदाच विटनेस बॉक्स

तसेच निवड न झालेले उमेदवार आहेत त्यांना देखील प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत जेणेकरून त्यांना भविष्यात पुजारी पदासाठी बोलावले जाण्याची संधी मिळेल, असे राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांनी सांगितले.मुलाखतीदरम्यान उमेदवारांना वेगवेगळ्या पूजेच्या प्रक्रियेबद्दल कठीण प्रश्न विचारले जात आहेत. यामध्ये ‘संध्या वंदन’, त्याची कार्यपद्धती आणि मंत्र, विशेष मंत्र आणि प्रभू रामाच्या उपासनेसंबंधी ‘कर्मकांड’ इत्यादींचा समावेश आहे, असे गिरी म्हणाले.

निवडलेल्या २० उमेदवारांना कारसेवकपुरम येथे सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल ज्यामध्ये विश्व हिंदू परिषद (VHP) सह अनेक हिंदू संघटनांची कार्यालये आहेत.प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना मोफत भोजन आणि निवासाची सोय केली जाणार आहे. तसेच त्यांना मासिक स्टायपेंड म्हणून प्रत्येकी २,००० रुपये देखील दिले जाणार असल्याचे ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांनी सांगितले.

 

Exit mobile version