जोपर्यंत इस्लाम टिकेल तोपर्यंत कोणतेही राज्य, जग सुसंस्कृत होणार नाही, असे परखड मत निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी मांडले आहे. जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात हिंदू पर्यटकांना लक्ष्य करून ठार करण्यात आले. पर्यटकांवर गोळीबार करताना त्यांची ओळख पटविण्यात आली. ते मुस्लिम नाहीत, हिंदू आहेत हे पाहूनच त्यांना मारण्यात आले. सध्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
जगभरातून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला जात असून दहशतवादाविरोधात भारतासोबत उभं राहण्याचे आश्वासन अनेक देशांनी दिले आहे. हा भ्याड हल्ला झाल्यानंतर निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही त्यांचे परखड मत ट्वीट करून व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “जोपर्यंत इस्लाम टिकेल तोपर्यंत दहशतवाद टिकेल. जोपर्यंत इस्लाम टिकेल तोपर्यंत गैर-मुस्लिमांना सुरक्षित राहता येणार नाही, मुक्त विचारवंतांना आणि बुद्धिवादी लोकांना सुरक्षित राहता येणार नाही, महिलांना सुरक्षित राहता येणार नाही. जोपर्यंत इस्लाम टिकेल तोपर्यंत फुले सुकतील, मुले मरत राहतील, लाखो मृत पावत राहतील. इस्लामच्या गर्भाशयातून द्वेष जन्माला येत राहील, कुरूप राक्षस जन्माला येत राहतील. जोपर्यंत इस्लाम टिकेल तोपर्यंत कोणतेही राज्य सुसंस्कृत होणार नाही, जग सुसंस्कृत होणार नाही,” असे स्पष्ट मत तस्लिमा नसरीन यांनी मांडले आहे.
As long as Islam survives, terrorism will survive.
As long as Islam survives, non-Muslims will have no safety, free thinkers and rationalists will have no safety, women will have no safety.
As long as Islam survives, flowers will wither, children will keep dying, millions of dead…— taslima nasreen (@taslimanasreen) April 22, 2025
हे ही वाचा :
पहलगाम हल्ल्यात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमधील तीन पर्यटकांचा मृत्यू
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाकडून जादा उड्डाणं; आणखीही सेवा उपलब्ध
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा हातात बंदूक धरलेला फोटो आला समोर
जम्मू-काश्मीर: दहशतवादी म्हणाला, ‘जा आणि मोदींना सांगा’
दरम्यान, पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. एनआयएचे पथक श्रीनगरमध्ये पोहोचले आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथके देखील उपस्थित आहेत. लष्कर, सीआरपीएफ, एसओजी, जम्मू पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.