चेक प्रजासत्ताकमधील एक प्रसिद्ध प्रभावशाली आणि दूरदर्शन होस्ट अमिल बार्टोशेक यांनी लायसा नाड लबेमजवळ एका हेलिकॉप्टरमधून तब्बल दहा लाख डॉलर्स फेकून लोकांना चकित केले.प्रसिद्ध बार्टोशेक हा काझमाने या नावाने ओळखला जातो.बार्टोशेकने ही रक्कम प्रथमतः एका स्पर्धेद्वारे जिंकणाऱ्या विजेत्याला देण्याचे ठरवले होते.काझमा यांचा ‘वनमॅनशो: द मूव्ही’ या चित्रपटात एक कोड लपवलेला होता.चित्रपटात लपलेल्या कोडचा जो कोणी उलगडा करेल त्यालाच ही रक्कम देण्यात येणार होते.मात्र,कोडचा उलगडा करणे अतिशय कठीण असल्याने कोणीही याचा उलगडा करू शकला नाही.
चित्रपटातील कोडचा उलगडा न झाल्याने बार्टोशेक याने एक योजना आखली.या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व स्पर्धकांमध्ये हे पैसे वाटण्याचे त्याने ठरवले.रविवारी पहाटे बार्टोशेकने सर्व स्पर्धकांना एक ईमेल पाठवला या ईमेलमधून सर्व स्पर्धकांना पैसे कोठे सोडणार आहे याची माहिती दिली.आपल्या शब्दाप्रमाणे हेलिकॉप्टरने ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी तो पोहोचला.
काझमा याने आपल्या इन्स्टा खात्यावर एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, चेक प्रजासत्ताकमध्ये ‘पैशांचा खरा पाऊस’. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही, असे देखील त्याने लिहिले.दहा लाख डॉलर्स रकमेने भरलेला एक कंटेनर चेक प्रजासत्ताकवरून उड्डाण करणार असल्याचे त्याने यापूर्वी जाहीर केले होते.तसेच पैसे कोठे उडवण्यात येईल याची संपूर्ण माहिती त्याने स्पर्धकांना दिली होती.
आकाशातून पैशांचा वर्षाव होताच, शेतात जमलेल्या हजारो लोकांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरून एका तासापेक्षा कमी वेळेत सर्व नोटा जमा केल्या. याचा व्हिडिओ शेअर झाला यामध्ये काही लोक बॅग घेऊन मैदानात धावत आहेत, ज्यामध्ये जितके शक्य होईल तितके पैसे गोळा करण्याचा प्रयत्न लोक करताना दिसत आहेत.काहींनी पैसे पकडण्यासाठी छत्रीचा वापर केल्याचेही दिसत आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेत बंदुकधाऱ्याच्या अंदाधुंद गोळीबारात २२ ठार
वकील सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड प्रकरणी तिघांना अटक
बीड मध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात १० जणांचा मृत्यू
प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रण हे अहोभाग्य!
काझमा यांनी नोंदवले की, ४००० लोकांनी एक डॉलरची रक्कम गोळा केली.विशेष म्हणजे प्रत्येक नोटेशी एक QR कोड जोडलेला होता,हा कोड ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी जोडला गेला होता, यामध्ये स्पर्धकाला मिळालेली रक्कम कोणत्याही संस्थेला दान करायची असेल तर तो करू शकतो.
कार्यक्रमापूर्वी, काझमा यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांनी पैशाचे काय करावे याबद्दल त्यांचे विचार व्यक्त केले होते.ते म्हणाले,कमावलेल्या पैशांचे काय करावे यासाठी अनेकांनी मला कल्पना दिल्या.यामध्ये अनेकांनी सांगितले की, या पैशाने एखाद्याला मदत करा, चांगल्या गोष्टीसाठी पैशाचा वापर करा, खेळलेल्या खेळाडूंना ते पैसे वाटून द्या तसेच या पैशाने दुसरा शो बनवा, अशा कल्पना अनेकांनी दिल्या.त्यानंतर पैशाचे काय करायचे याचा मी विचार केला आणि मग मला वाटले की, तुम्ही सुचवलेल्या कल्पना एकत्र करून याचा वापर करू.