३१ व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेची सुरुवात झाली ती दोन दमदार शतकाने. माहुल सेंटरचा एकलव्य खाडे याने १८० धावांची खेळी केली तर बोरिवली केंद्राच्या आर्यन सकपाळने १२१ धावा केल्या. त्याआधी, महिला क्रिकेटपटू पूनम राऊत, दिग्दर्शक आणि अभिनेते विजय केंकरे, एल आय सी समूहाच्या अर्चना शानभाग (शाखा प्रबंधक) आणि एम सी ए चे पदधिकारी यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उदघाटन सोहळा पार पडला.
संक्षिप्त धावफलक
गट अ
१. पालघर केंद्र : ३८ सर्वबाद (आर्यन दुबे ४/११, प्रणव निजाई 3/23) विरार केंद्र विरुद्ध : २३१/१० (जय नादर ४९, एल्टन सोरेस ७२, वेदांत गुरव नाबाद ४४*, दैविक सावे ३/६३, अनशूल ३/१९)
2. घणसोली केंद्र : १६०सर्वबाद (यश जाधव ४५, चिन्मय चौधरी ५६, साई घाग ५/४७, अर्णव गुप्ता ३/३०) विरुद्ध माटुंगा केंद्र : ५८/१
गट ब
१. दिवा केंद्र : १०५ सर्वबाद (प्रभंजन पाताडे ५/४६) आणि १६/१ विरुद्ध डोंबिवली केंद्र : ६४/९ डाव घोषित (यज्ञेश कामत४/१६, सचिन विचारे ३/१५)
२. खारघर केंद्र :१३८ सर्वबाद (अंशुल मोरजे ४/४६) विरुद्ध मुलुंड केंद्र : ११८/० (श्रीहान हरिदास नादाद ५६, देवांश राय नाबाद ४८)
गट क
१. अंधेरी केंद्र : ९३ सर्वबाद (मयंक सावंत ३४, क्रिश यादव ६/२२) आणि ४५/० (रझा मिर्झा नाबाद ३७) विरुद्ध दहिसर केंद्र : ९४ सोरिश देशपांडे ३/१८)
2. ठाणे केंद्र : २५२/९ डाव घोषित (अमानत हुसेन ७४, वेदांत चव्हाण ४५, अभिनंदन चव्हाण ४४, सनी सिंग ३/२७) विरुद्ध केंद्र : वरळी सेंटर ६/०
हे ही वाचा:
गट ड
१. कल्याण केंद्र येथे : २१२/८ डाव घोषित (हर्ष पाटील ६८, देवांशू देसले नाबाद ५७* अनिकेत पाटील ४७, सुजल भोईर ३/४७) विरुद्ध भिवंडी केंद्र : ९ षटकांत ३१/३
२. माहुल केंद्र: ३११/६ (एकलव्य खाडे १८०, १२१ चेंडू, २५x४, ५x६, अर्जुन यादव ४२) वि वांगणी केंद्र :
गट इ
१. डहाणू केंद्र: १८६/९ डाव घोषित (आरुष ठाकूर ६३, दैविक भोईर नादाद ३२*, राज शिंदे ४/६) विरुद्ध वसई केंद्र : २२/३
२. बोरिवली केंद्र : २९१ डाव घोषित (आर्यन सकपाळ १२१ १९० चेंडू, १३x४, अर्जुन लोटलीकर ७७) विरुद्ध वांद्रे सेंटर