क्रूझ ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानला गुरुवारी उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. २ नोव्हेंबर रोजी अभिनेता शाहरुख खानचा वाढदिवस असून आर्यन खान वडिलांचा वाढदिवस मन्नतवर साजरा करणार आहे. आर्यन खान याचाही वाढदिवस १३ नोव्हेंबर रोजी आहे. मात्र आर्यनला त्याची आई गौरी खानचा वाढदिवस साजरा करता आला नव्हता. त्यावेळी तो न्यायालयीन कोठडीत होता.
गौरी खानचा ८ ऑक्टोबर रोजी वाढदिवस झाला त्या वेळी आर्यन खान याला ७ ऑक्टोबर रोजी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती व ८ ऑक्टोबर रोजी त्याची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. गेले २६ दिवस आर्यन खान तुरुंगात होता. या २६ दिवसांत झालेल्या सुनावणी, युक्तिवादानंतर अखेर गुरुवारी त्याला जामीन मंजूर झाला. अर्थात, गुरुवारी तो आदेश मिळणे शक्य नसल्याने त्याला कदाचित शुक्रवारी तुरुंगाबाहेर पडता येईल.
कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलेल्या छापेमारीत आर्यन खानला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत आणखी ८-१० लोकांना ताब्यात घेतले गेले होते. गुरुवारी आर्यनसह, अरबाज खान, मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर झाला. हे प्रकरण गेले महिनाभर गाजत आहे. त्यावरून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही आरोपांची राळ उडविण्यात आली.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारविरोधात समीर वानखेडे गेले उच्च न्यायालयात
पालिकेत ‘भंगार’ रॅकेट; लिलाव करणाऱ्याचा आणि लाभार्थ्याचा पत्ता एकच!
दिवाळीच्या सुट्ट्यांवरून शिक्षण विभागाचे निघाले दिवाळे
राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप केले. त्यात खासगी स्वरूपाचे आरोपही करण्यात आले. त्यावरून राज्यातले वातावरण तापले आहे.