रामानंद सागर यांच्या गाजलेल्या रामायण या मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले आहे. मंगळवार, ५ ऑक्टोबर रोजी रात्री हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्रिवेदी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वयोमानानुसार अरविंद त्रिवेदी यांना अनेक व्याधींनी जखडले होते. त्यांना हिंडता फिरता येत नव्हते. गेली अनेक वर्षे त्यांची प्रकृती अस्थिर होती. गेल्या तीन वर्षात ती अधिकच खालावली होती. या काळात दोन-तीन वेळा त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिन्याभरापूर्वी असते. रुग्णालयातून पुन्हा घरी येणार. त्यांना ५ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ साडे नऊच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि कांदिवली येथील त्यांच्या राहत्या घरीच त्यांचे निधन झाले. डॉक्टरांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली.
हे ही वाचा:
गांधीनगर महापालिकेत भाजपाच सरस
तळकोकणात राणेच किंगमेकर! वेंगुर्ला नगरपालिकेत महाविकास आघाडीला धक्का
ईडीसमोर हजर राहण्यासाठी भावना गवळींना हवे अजून १५ दिवस!
मुंबई पालिका म्हणतेय, छट्, तिसरी लाट वगैरे काही येणार नाही!
अरविंद त्रिवेदी यांनी शेकडो गुजराती नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर अनेक मालिकांतही त्यांनी भूमिका केली आहेत. पण रामानंद सागर यांच्या मालिकेत साकारलेली रावणाची भूमिका अजरामर ठरली. तर विक्रम वेताळ मालिकेतील त्यांच्या भूमिकेसाठीही त्यांचे खूप कौतुक झाले. अभिनयक्षेत्रात व्यतिरिक्त त्रिवेदी राजकीय क्षेत्रातही सक्रिय होते. १९९१ ते १९९६ या कालावधीत गुजरातमधील साबरकांठा या मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती आणि खासदार म्हणून निवडून देखील आले होते.