25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषकेजारीवालांना उपरती, देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा !

केजारीवालांना उपरती, देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा !

विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत ठरवणार नवा मुख्यमंत्री 

Google News Follow

Related

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. नुकतेच तिहार तुरुंगातून जामिनावर सुटलेल्या मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. जनतेच्या दरबारात जावून याबाबत जनतेशी संवाद साधून, त्यांचा निर्णय घेणार आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आतापर्यंत राजीनामा दिला नव्हता. महाराष्ट्राच्या निवडणुकांसोबत नोव्हेंबरमध्ये दिल्लीच्याही निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केजरीवाल यांनी आपल्या भाषणात केली. दरम्यान,  फेब्रुवारीमध्ये दिल्लीच्या निवडणुका होणार आहेत.

आगामी दोन दिवसामध्ये विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत नाव मुख्यमंत्री ठरणार असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले. मी आणि मनीष सिसोदिया, आम्हा दोघांना जनता जोपर्यंत इमानदार म्हणत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसणार नाही, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

राजस्थानच्या जहाजपुरमध्ये हिंदूंच्या मिरवणुकीवर मुस्लीम समुदायाकडून दगडफेक

राजगुरूनगरमध्ये एकवटला सकल हिंदू समाज

ख्रिश्चन धर्मीयांकडून गणपती विसर्जनाच्या वाटेत ‘मिरचीची धुरी’

सत्ता आल्यास एक तासात दारूबंदी रद्द करणार

दरम्यान, दिल्ली दारू घोटाळयाप्रकरणी मुख्यमंत्री केजरीवाल १७० हून अधिक दिवस तुरुंगात होते, १० लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर त्यांना नुकताच जामीन मिळाला होता. जामीन मंजूर करताना त्यांच्यावर काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये अरविंद केजरीवाल यांची १० लाख रुपयांच्या जामीनावर मुक्तता केली जाईल. अरविंद केजरीवाल हे दिल्ली मद्य धोरण प्रकरणावर जाहीरपणे भाष्य करू शकत नाहीत. अरविंद केजरीवाल यांना जोपर्यंत हजेरीतून सूट दिली जात नाही तोपर्यंत ट्रायल कोर्टासमोर प्रत्येक सुनावणीच्या वेळी हजर राहावेचं लागेल.

अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या कार्यालयात जाता येणार नाही. अरविंद केजरीवाल यांना सरकारी फाईल्सवर स्वाक्षरी करता येणार नाही. जामीनावर बाहेर असताना अरविंद केजरीवाल हे या प्रकरणाशी संबंधित साक्षीदारांशी संपर्क साधणार नाहीत किंवा तसा प्रयत्नही करू शकत नाहीत, या न्यायालयाच्या सर्व अटी मान्य केल्यानंतर १० लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर मुख्यमंत्री केजरीवाल यांचा जमीन मजूर करण्यात आला.  

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा