दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या ईडीच्या ताब्यात आहेत.मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेनंतर सरकार कसे चालणार हा प्रश्न उपस्थित होत होता.अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळाले आहे.मुख्यमंत्री केजरीवाल हे तुरुंगातूनच सरकार चालवणार असल्याचे दिसून येत आहे.कारण अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून पहिला आदेश जारी केला आहे. दिल्लीच्या जल मंत्रालयाशी संबंधित त्यांनी एक आदेश जारी केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शहरातील काही भागात पाणी आणि गटार समस्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. शहरातील या समस्या सोडवण्यासाठी जलमंत्री अतिशी यांना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आदेश दिले आहेत.पाणी टंचाईमुळे भागात पुरेसे पाण्याचे टँकर तैनात करण्याचे निर्देश मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिले आहेत.जलमंत्री अतिशी यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिलेल्या आदेशाची माहिती दिली.
हे ही वाचा :
‘आप’कडून अनैतिक राजकारणाचे उदाहरण’
पापुआ न्यू गिनीमध्ये शक्तिशाली भूकंप!
आयएसआयएसमध्ये सहभागी होण्यासाठी जाणारा आयआयटी गुवाहाटीचा विद्यार्थी ताब्यात!
कोलकात्याचा हैदराबादवर थरारक विजय!
दरम्यान, दिल्लीतील अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगचा आरोप ठेऊन ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. केजरीवाल यांना आता २८ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर केंद्रीय तपास यंत्रणेने अरविंद केजरीवाल यांना अटक केली असून ही अटक सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप आप पक्षाकडून करण्यात येत आहे.