लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देशाची राजधानी दिल्लीतील सर्व सात जागांवर मतदान होईल. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराचा आरोप करून आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला केला. पंतप्रधानांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ‘अनुभवी चोर’ असे संबोधले. तसेच, त्यांच्या घरी नोटांच्या थप्प्या का नाही सापडल्या, याचेही उत्तर दिले.
इंडिया टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत जेव्हा मोदी यांना विचारले की, केजरीवाल म्हणतात, बाकी जागांवर नोटांच्या थप्प्या मिळतात, माझ्याकडे एक चाराणेही मिळाले नाहीत. यावर मोदी यांनीही उत्तर दिले. ‘ते आधी सरकारी अधिकारी होते. त्यांना माहीत आहे की, सरकार कसे काम करते. ते स्वतःचा बचाव करण्यासाठी नाकाबंदी करतीलच,’ असे मोदी म्हणाले. ‘जो अनुभवी चोर असतो, त्याला मोठी सुविधा मिळते. सरकारमध्ये अधिकारी असणाऱ्याला ईडी आणि सीबीआय कशी कारवाई करते, हे माहीत असते. त्यातून वाचण्याची तजवीज ते आधीच करतात,’ असेही मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
‘मुलगा नाही, ड्रायव्हर गाडी चालवत होता’
केजरीवाल आणि उद्धव ठाकरेंची सहानुभूती सेम टू सेम!
मीडियाचा डाव फडणवीसांनी उधळला !
पवार, राहुल गांधींना लोणी का लावतायत?
पंतप्रधान मोदी यांना विचारण्यात आले की, निवडणुकीआधी दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात आले, असा आरोप सरकारवर होत आहे. त्यावरही मोदी यांनी उत्तर दिले. ‘तुम्ही नोटांचे डोंगर पाहिलेत की नाही? या नोटांचा डोंगर पाहून तुम्हाला काय वाटते. हे मेहनतीचे पैसे असतील का? नोटांचे डोंगर पकडले जातील आणि सरकारने काहीच नाही केले तर लोकांना वाटेल की यांचे काहीतरी साटेलोटे आहे. केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी तुम्ही दिल्लीच्या मुलांचे भविष्य बरबाद करण्यासाठी शाळेच्या जवळ दारूची दुकाने उघडली,’ असे मोदी म्हणाले.