नाटकाचा पडदा उघडण्यासाठी रंगकर्मी करणार नटराजाची आरती

नाटकाचा पडदा उघडण्यासाठी रंगकर्मी करणार नटराजाची आरती

रंगकर्मींनी क्रांतिदिनी त्यांच्या मागण्या आणि समस्या शासनापर्यंत पोहचवण्यासाठी आंदोलन केले होते.  आंदोलनानंतर अभिनेते विजय पाटकर यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली होती; तेव्हा रंगकर्मींच्या काही मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने पुन्हा एकदा रंगकर्मी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

३० ऑगस्ट पासून आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होणार असून दादर येथील शिवाजी नाट्य मंदिर येथे सायंकाळी ७ वाजता नटराजाची महाआरती करून हे आंदोलन होईल. नाट्यगृह आणि चित्रपटगृह तातडीने सुरू करावे, या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. मागणीनुसार १ सप्टेंबरपासून ती सुरू होतील, असे आश्वासन मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेवट्टीवार यांनी दिले होते. परंतु १ सप्टेंबर जवळ आला तरी चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरू करण्यासाठी शासनाकडून कोणतीही हालचाल दिसत नसल्यामुळे सरकारने दिलेले आश्वासन पाळायला हवे, अशी भूमिका घेत रंगकर्मी पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहेत.

 ही वाचा:

राणे म्हणतात, नाणार होणारच!

रोनाल्डोची घरवापसी

नाव इनोसंट, पण करत होता पाप!

अखेर राष्ट्रवादीला दिसले रस्त्यावरील खड्डे

सोमवार, ३० ऑगस्ट रोजी राज्यभरतील नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांसमोर नटराजाची महाआरती केली जाणार आहे. नाटक व सिनेमाचा पडदा १ सप्टेंबरलाच उघडावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. तसेच आपापल्या जिल्ह्यांतून या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन रंगकर्मींना करण्यात आले आहे. सरकारने दिलेला शब्द त्यांनी पूर्ण करावा. आम्ही त्याची वाट पाहत आहोत. सरकारने आता भूमिका घ्यायला हवी. म्हणूनच महाआरती आंदोलनातून घंटानाद करून तो सरकारच्या कानी पोहचवण्याचा उद्देश आहे, असे अभिनेते विजय पाटकर यांनी सांगितले.

Exit mobile version