प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले.ते ९७ वर्षांचे होते.अमृता प्रीतम यांच्यासोबतच्या नात्यानंतर इमरोज हे चर्चेत आले होते.इमरोज यांना इंद्रजित सिंह या नावाने देखील ओळखले जायचे.इमरोज आणि अमृता यांची प्रेमकथा ही काही खास प्रेमकथांपैकी एक आहे.दोघेही ४० वर्ष एकमेकांसोबत राहिले मात्र, दोघांनी कधीही लग्न केले नाही.
इमरोज यांचा जन्म १९२६ मध्ये लाहोरपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात झाला. इमरोज यांनी जगजीत सिंह यांच्या ‘बिरहा दा सुलतान’ आणि बीबी नूरनच्या ‘कुली रह विचार’सह अनेक प्रसिद्ध एलपीचे मुखपृष्ठ डिझाइन केले होते.इमरोज यांच्या निधनानंतर कॅनडातील इक्बाल महल यांनी शोक व्यक्त केला ते म्हणाले की, “मी त्यांना १९७८ पासून वैयक्तिकरित्या ओळखत आहेत. अमृता त्यांना ‘जीत’ म्हणायची”
मिळालेल्या माहितीनुसार, अमृता तिच्या ‘नागमानी’ या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठ डिझाइनसाठी कलाकाराच्या शोधात होती. या शोधात त्याची इंद्रजितशी भेट झाली. इथून त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. इमरोजचे अमृतावर इतके प्रेम होते की, त्याने तिच्यासाठी ‘अमृता के लिए नज्म जारी है’ या नावाचे पुस्तक लिहिले होते, जे २००८ मध्ये प्रकाशित झाले होते.
हे ही वाचा:
बजरंग पुनिया ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करणार
मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊदच्या जागेचा लिलाव!
डॉ. बालाजी आसेगावकर यांना केशवसृष्टी पुरस्कार
दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज केशव महाराजसाठी ‘राम सिया राम’
ज्या मित्रांनी इमरोजला त्याच्या शेवटच्या दिवसात पाठींबा दिला, त्यांचे म्हणणे आहे की, कवीची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खालावली होती.पाईपलाईन मधून त्यांना अन्न दिले जात होते.मात्र, आजारी असे असूनही कवीला त्याच्या प्रेमाची रोज आठवण येत होती.
अमृता प्रीतम यांनी पंजाबी आणि हिंदीमध्ये कविता आणि कादंबऱ्या लिहिल्या. त्यांनी १०० हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांच्या काही प्रसिद्ध कलाकृती फाइव्ह इयर्स लाँग रोड, पिंजर, अदालत, कोरे कागज, उंचास दिन, सागर और सिपियां या आहेत.अमृता आणि इमरोज यांच्या वयात सात वर्षांचा फरक होता. २००५ मध्ये अमृताचे निधन झाले. मृत्यूपूर्वी अमृताने इमरोजसाठी ‘मी तुला पुन्हा भेटेन’ अशी कविता लिहिली होती.अमृताच्या मृत्यूनंतर इमरोज यांनी एक कविता लिहिली, ‘तिने देह सोडला, संगती नाही.’