सरकार येईल जाईल पण हा देश टिकला पाहिजे !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनात केले भावनिक आवाहन

सरकार येईल जाईल पण हा देश टिकला पाहिजे !

सोमवार दि.१८ पासून संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाची सुरुवात झाली.पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला संबोधित केले.संसदेच्या जुन्या इमारतीमध्ये मोदींचे भाषण हे शेवटचे ठरले.जुन्या संसद इमारतीमध्ये घेण्यात आलेल्या ”ऐतिहासिक निर्णयांचे” मोदींनी आपल्या भाषणात वर्णन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात जुन्या संसद भवनातील अनुभव, आठवणी आणि आतापर्यंतचा प्रवास यासंदर्भात भाषण केले.मोदींचे हे भाषण जुन्या संसद इमारतीमध्ये शेवटचे ठरले असून उद्या मंगळवारी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर संसदेच्या नवीन इमारतीत पुढील अधिवेशन होणार आहे.माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या अनुभवाची आणि योगदानाची आठवण करून देताना जुन्या संसदेची इमारत सोडणे हा “अत्यंत भावनिक क्षण” असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

संसदेचे विशेष अधिवेशन ऐतिहासिक निर्णयांचे ठरणार

बेस्ट बसमध्ये पैसे विसरणारे प्रवासी वाढले; चार वर्षांत ८ हजार छत्र्याही लोक विसरले

भारताने आठव्यांदा जिंकला आशिया चषक

‘इंडी’ आघाडी पत्रकारांवरील बहिष्कार मागे घेणार?

संसदेच्या जुन्या इमारतीतील आपल्या शेवटच्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, या सभागृहात अनेक “ऐतिहासिक निर्णय आणि अनेक दशकांपासून प्रलंबित समस्यांचे निराकरण” करण्यात आल्याचे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले.या सभागृहात कलम ३७० रद्द करणे शक्य झाले.इथे जीएसटीही मंजूर झाला. या सभागृहाने एक रँक वन पेन्शन पाहिली.तसेच देशात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी १० टक्के आरक्षण यशस्वीरीत्या मंजूर झाले आणि तेही कोणत्याही वादविना, पंतप्रधान म्हणाले.पंडित जवाहलाल नेहरू तसेच अटल बिहारी वाजपेयी या माजी पंतप्रधानांच्या योगदानाचा उल्लेख मोदींनी केला तसेच अटलजींच्या ‘सरकारें आयेंगी’ जायेंगे,पार्टियां बनेगी, बिगेडगी; मगर ये देश रहना चाहिये.”या भाषणाचा उल्लेख मोदींनी केला.

“आज सर्व भारतीयांच्या कर्तृत्वाची सर्वत्र चर्चा होत आहे. संसदेच्या ७५ वर्षांच्या इतिहासातील आमच्या एकत्रित प्रयत्नांचे हे फळ आहे. चांद्रयान-३ च्या यशाने केवळ भारतालाच नाही तर जगाला अभिमान वाटला आहे. तंत्रज्ञान, विज्ञान, आपल्या शास्त्रज्ञांची क्षमता आणि देशातील १४० कोटी लोकांच्या सामर्थ्याशी जोडलेल्या भारताच्या सामर्थ्याचे एक नवीन रूप अधोरेखित केले. आज मी पुन्हा एकदा आपल्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करू इच्छितो, मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “(संसदेवर) दहशतवादी हल्ला झाला. हा इमारतीवरील हल्ला नव्हता. एकप्रकारे हा लोकशाहीच्या मातेवर, आपल्या जिवंत आत्म्यावर हल्ला होता. देश हे कधीही विसरू शकत नाही. घटना. दहशतवाद्यांशी लढताना ज्यांनी संसदेचे आणि सर्व सदस्यांचे रक्षण करण्यासाठी छातीवर गोळ्या झेलल्या त्यांच्यापुढे मी नतमस्तक,असल्याचे मोदींनी सांगितले.

Exit mobile version