फडके रोड राहणार सुना सुना, जमावबंदी लागू

फडके रोड राहणार सुना सुना, जमावबंदी लागू

डोंबिवलीतील फडके रोड वरील प्रसिद्ध अशा दिवाळी पहाट कार्यक्रमावर यावर्षीही गदा आली आहे. एकीकडे कोविड महामारीचे प्रमाण कमी होऊन सर्व परिस्थिती पूर्ववत होत असतानाच डोंबिवलीतील फडके रोड परिसरात मात्र कलम १४४ लागू करण्‍यात आले आहे. यामुळे यंदाच्या वर्षीही दिवाळीला फडके रोड सुना सुना असणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने हा संचार बंदीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी तरुणाई एकत्र येऊ नये आणि गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे खबरदारी घेतली जात आहे. यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

ठाणे शहर पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार हे १४४ कलम अर्थात जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या जमावबंदी आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी डोंबिवलीतील तरुणाईला फडके रोड वरील उत्साह अनुभवता येणार नाही.

हे ही वाचा:

भाजपासाठी का आहे मध्यप्रदेशच्या जोबटचा विजय महत्वाचा?

स्वातंत्र्यवीरांवर होणाऱ्या क्षमापत्रांच्या आरोपाचे सप्रमाण खंडन करणारे अक्षय जोग यांचे नवे पुस्तक

‘पंजाब लोक काँग्रेस’सह कॅप्टन मैदानात

आसाममध्ये भाजपाला निर्भेळ यश

डोंबिवलीतील तरुणांसाठी दिवाळी आणि फडके रोड हे समीकरण न तुटणारे आहे. डोंबिवलीतील सुप्रसिद्ध अशा फडके रोडवर दिवाळीच्या पहिल्या दिवशी शहरातील तरुणाई एकत्र जमत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. पारंपारिक वेशात एकत्र जमत तरुण-तरुणी मोठ्या उत्साहात दिवाळीची ही पहाट साजरी करतात. फडके रोड वरील ही दिवाळी पहाट खूपच प्रसिद्ध असून आसपासच्या इतर शहरातील तरुण तरुणीही या दिवाळी पहाटच्या जल्लोषात सहभागी होण्यासाठी डोंबिवलीत दाखल होतात. पण गेले दोन वर्ष कोरोना परिस्थितीमुळे या दिवाळी पहाट कार्यक्रमाला बंदीचे ग्रहण लागले आहे.

Exit mobile version