भारताने ऑस्ट्रेलियाला टी २० सामन्यांत १९व्या वेळा पराभूत केले आहे. एका संघाविरोधात भारताने मिळवलेले हे सर्वाधिक विजय आहेत. त्यांनी श्रीलंका आणि वेस्ट इंडिजलाही टी-२०मध्ये प्रत्येकी १९ सामन्यांत पराभूत केले आहे.भारताने ऑस्ट्रेलियाला पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात सहा धावांनी पराभूत केले. या विजयाबरोबरच भारताने ही मालिका ४-१ने जिंकली. भारताने विशाखापट्टणम येथे दोन विकेटने तर, तिरुवनंतपूरम येथे ४४ धावांनी विजय मिळवला. यानंतर गुवाहाटीमध्ये ऑस्ट्रेलियाने पाच विकेटने विजय मिळवला. भारताने पुन्हा दमदार पुनरागमन करून शेवटचे दोन सामने खिशात घातले. त्यांनी ऑस्ट्रेलियाला रायपूरमध्ये २० आणि आता बंगळुरूमध्ये सहा धावांनी पराभूत केले.
भारताने ऑस्ट्रेलियाला टी २० सामन्यांत १९वेळा पराभूत केले. एका संघाच्या विरोधात भारताने आतापर्यंत मिळवलेले हे सर्वाधिक विजय आहेत. भारताने वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरोधातही ही कामगिरी केली आहे. मात्र सर्वाधिक विजयाचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. त्यांनी न्यूझीलंडला २० वेळा पराभूत केले आहे.ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेड याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने २० षटकांत आठ विकेट गमावून १६० धावा केल्या.
हे ही वाचा:
२०२४ ला देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील
तेलंगणामध्ये हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, दोन वैमानिकांचा मृत्यू!
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात!
अधिवेशनात पराभवाचा राग काढू नका
मात्र प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा संघ २० षटकांत आठ विकेट गमावून केवळ १५४ धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाच्या वतीने मॅकडरमॉटने सर्वाधिक ५४ धावा केल्या. ट्रेव्हिस हेडने २८ आणि मॅथ्यू वेडने २२ धावा केल्या. टीम डेव्हिडने १७ आणि मॅथ्यू शॉटने १६ धावा केल्या. एरॉन हार्डी सहा आणि जोश फिलिप चारच धावा करू शकला. भारताच्या मुकेश कुमारने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर, अर्शदीप सिंह आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. अक्षर पटेलने एक विकेट घेतली.
भारतीय संघाची सुरुवात वाईट झाली. भारताला पॉवर प्लेच्या सुरुवातीच्या सहा षटकांत दोन धक्के बसले. दोन्ही सलामीवीर यशस्वी जयस्वाल (२१) आणि ऋतुराज गायकवाड (१०) झटपट तंबूत परतले. त्यानंतर यशस्वी षटकार मारण्याच्या प्रयत्नात जेसन बेहरेनडॉर्फच्या चेंडूवर लेगसाइडला एलिसला झेल दिला. नंतर जितेश आणि श्रेयस यांनी २४ चेंडूंमध्ये ४२ धावांची भागीदारी रचली. श्रेयसने ५३ धावा केल्या तर, अक्षर पटेल ३१ धावा करून बाद झाला. मात्र दोघांनी संघाची १६० धावसंख्या उभारण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.