शनिवारी एका रोमांचक सामन्यात पंजाब किंग्सने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला १३ धावांनी पराभूत नक्कीच केले आणि त्यात पंजाबचा अर्शदीप यशस्वी गोलंदाजही ठरला. पण या सामन्यात अर्शदीपने केलेल्या कामगिरीमुळे आयपीएलला फटका बसला.
अर्शदीपने या सामन्यात अखेरचे दमदार षटक टाकले आणि सामन्याचे सारे चित्रच बदलून गेले. त्याच्या या गोलंदाजीबद्दल सगळ्यांनी त्याचे कौतुक केले. पण याच गोलंदाजीदरम्यान त्याने प्रतिस्पर्धी फलंदाजाला त्रिफळाचीत करताना मधली यष्टी उद्ध्वस्त केली तेव्हा ती यष्टी मोडूनही पडली. याच यष्टीमध्ये एक कॅमेरा बसविण्यात आलेला असतो तसेच जेव्हा चेंडूचा स्पर्श यष्टीला होतो तेव्हा त्यातील दिवेही पेटतात. साहजिकच ही यष्टी महागडी असते. पण अर्शदीपने चक्क दोनवेळा यष्टी उद्ध्वस्त करून तो मोडली. यासंदर्भातील अशी माहिती समोर आली की, या एलईडी यष्ट्या आणि त्यावर असलेल्या झिंग बेल्स या किमान ३० लाख रुपयांना विकत मिळतात. या यष्टी आणि बेल्समध्ये दिवे लागलेले असतात आणि ते स्पर्श केल्यावर चमकू लागतात. पण यापैकी दोनवेळा यष्टी मोडून पडल्यामुळे २० लाखांची नुकसान झाल्याचे सांगण्यात येते आहे.
Stump breaker,
Game changer!Remember to switch to Stump Cam when Arshdeep Akram bowls 😄#MIvPBKS #IPLonJioCinema #IPL2023 #TATAIPL | @arshdeepsinghh pic.twitter.com/ZnpuNzeF7x
— JioCinema (@JioCinema) April 22, 2023
२०१४पासून आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये या एलईडी स्टम्प आणि बेल्सचा वापर प्रथम सुरू झाला. तेव्हापासून पांढऱ्या चेंडूने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये या यष्ट्या वापरल्या जात आहेत.
हे ही वाचा:
पंतप्रधानांना आत्मघाती बॉम्ब हल्ल्याचे धमकी पत्र लिहिणारा पोलिसांच्या जाळ्यात
NASA : २१ वर्षांपूर्वी आकाशात झेपावलेला स्पेसक्राफ्ट कोसळले; अनर्थ टळला !
आता ‘वॉटर मेट्रो’ने घ्या केरळच्या बॅक वॉटरचा आनंद
एक लाख पुस्तकांच्या सड्याने डोंबिवलीचा फडके रोड बहरला
अर्शदीपने जेव्हा शेवटचे षटक टाकायला प्रारंभ केला तेव्हा मुंबई इंडियन्सला या शेवटच्या षटकात १६ धावा हव्या होत्या. तिसऱ्या चेंडूवर त्याने समोरच्या फलंदाजाची मधली यष्टी उद्ध्वस्त केली तर पुढच्या चेंडूवर नेहल वढेराला तसेच त्रिफळाचीत केले तेव्हाही मधली यष्टी उद्ध्वस्त केली. या दोन्ही यष्टी मोडून पडल्या. याच दरम्यान अर्शदीपने आयपीएलमधील आपले ५० बळीही पूर्ण केले.